Texas Frisco Indian Flag Insult Video: अमेरिकेच्या टेक्सासमधून एक संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. एक स्थानिक वक्ती भारतीय ध्वजाचा अवमान करत, ध्वज फाडत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. टेक्सासमधील सिटी हॉलसमोर ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय ध्वजाचा अवमान

सोशल मीडिया एक्सवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पोस्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, फ्रिस्को-टेक्सासमधील हा व्हिडीओ असून, तोंडात सिगारेट घेऊन एक व्यक्ती सिटी हॉलसमोर भारतीय ध्वज फाडताना दिसत आहे. दरम्यान, यावेळी काही लोक त्याचं समर्थन करत त्याला प्रोत्साहन देत असल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. यावेळी भारताबाबत अर्वाच्य भाषा वापरल्याचे देखील व्हिडीओतून समोर आले आहे. उत्तर डॅलसमधील भारतीय स्थलांतरितांच्या अतिआक्रमणाविरुद्ध नागरिकांना संताप व्यक्त केल्याचा दावा केला जात आहे.

व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. “एक अमेरिकी व्यक्ती भारतीय ध्वज फाडून त्याचा अवमान करत असल्याचे पाहून खूप दु:ख झाले. कल्पना करा की मी जर अमेरिकेचा राष्ट्रीय ध्वज असाच फाडला तर? गोऱ्यांना काय वाटेल? मला हे पाहून रडू कोसळतंय”, असे एका नेटकऱ्यांने या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

दुसऱ्या एका व्यक्तीने या कृतीचा निषेध करत हा प्रकार अतिशय अयोग्य असल्याचे मत नोंदवले आहे. “द्वेषभावना कधीच योग्य नसते. हे स्थलांतरित कायदेशीर पद्धतीने इथं आले असून, त्यांना अमेरिकी संविधानानुसार पूर्ण अधिकार आहे. याविरोधात तुम्ही शांतपणे आवाजही उठवू शकता पण, हा एकार…”, अशी नाराजी युझरने व्यक्त केली आहे. आणखी एका युझरने ध्वज फाडण्याच्या कृतीचा निषेध करताना काही भारतीय द्वेष पसरवत असल्याचा आरोप देखील केला.

आम आदमीकडून टीका

दरम्यान, सध्या हा व्हिडीओ सशोल मीडियावर तूफान व्हायरल होत असून, भारतात याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आम पक्षाचे नेते मनीष सिसोदीयांनी यावरुन नरेंद्र मोदींवर टीका केली. “ट्रम्प यांच्या राज्यात भारतीय ध्वजाचा अपमान केला जात आहे. याच ट्रम्प यांच्या विजयासाठी मोदींनी पार्टीच्या नेत्यांकडून देशात होम केले होते. मोदी यांनी याबाबत ट्रम्प यांच्याशी चर्चा करावी,” असे मागणीही सिसोदियांनी केली. “व्यावसायिक मित्राला वाचवण्यासाठी चर्चा करु शकतात तर देशाच्या ध्वाजाचा अवमान रोखण्यासाठी देखील चर्चा करावी”, असे सिसोदीया म्हणाले.