वृत्तसंस्था, बँकॉक
थायलंडचे पंतप्रधान पेटॉन्गटार्न शिनावात्रा यांना निलंबित करण्याचा निर्णय तेथील कन्स्टिट्युशलन कोर्टाने मंगळवारी दिला. कंबोडियाच्या सेनेटचे अध्यक्ष हुन सेन यांच्याबरोबर संभाषण करताना शिनावात्रा यांनी नमती भूमिका घेतल्याचा आरोप झाला होता. याची चौकशी करण्यासाठी पंतप्रधानांना निलंबित करण्यात आले.

शिनावात्रा यांनी सीमावादाच्या मुद्द्यावर कंबोडियाचे सेनेट अध्यक्ष हुन सेन यांच्याबरोबर दूरध्वनीवरून केलेले संभाषण उघड झाले होते. या संभाषणादरम्यान शिनावात्रा यांनी अतिशय पडती भूमिका घेतली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. दोन्ही देशांदरम्यान २८ मे रोजी झालेल्या लष्करी संघर्षात कंबोडियाच्या एका सैनिाकाचा मृत्यू झाला होता. शिनावात्रा यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने ७-२ अशा बहुमताने निकाल दिला.