वृत्तसंस्था, बँगकॉक

थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना नैतिकतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने बुधवारी पदावरून हटवले. एक आठवड्यापूर्वी थायलंडमधील मुख्य विरोधी पक्ष विसर्जित करण्याचे आदेश दिले होते. आता न्यायालयाच्या पंतप्रधानांवरील कारवाईच्या आदेशाने थाई राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयीन अधिकाऱ्याला लाच देण्याचा कथित प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केलेल्या मंत्रिमंडळातील सदस्याच्या नियुक्तीवरून हा निर्णय घेतला.

Israel huge attack cuts off main lebanon syria road
लेबनॉनमधून सीरियात जाणारा मार्ग उद्ध्वस्त; इस्रायलचे लेबनॉनच्या दक्षिणेकडे जोरदार हवाई हल्ले
Naxals killed in encounter with police in Chhattisgarh
छत्तीसगडमध्ये ४० नक्षलवादी ठार; अबूझमाडच्या जंगलात मोठ्या घातपाताचा…
Ashwini Vaishnaw
Ashwini Vaishnaw : मोदी सरकार रेल्वेचं खासगीकरण करणार? रेल्वेमंत्री म्हणाले, “आम्ही पुढील पाच वर्षांत…”
PM Modi congratulates Israel's Netanyahu X
इस्रायल भारताबरोबर आहे का? ‘त्या’ वादग्रस्त नकाशावरून टीकेनंतर नेतान्याहू सरकार म्हणाले “आम्ही तातडीने…”
Ayatollah Khamenei on Iran Israel Tension Reuters
Ayatollah Khamenei : “..तर इस्रायल फार काळ टिकणार नाही”, इराणच्या अयातुल्लाह खोमेनींचं पाच वर्षांत पहिल्यांदाच सार्वजनिक भाषण; लष्कराला म्हणाले…
Man Kill father murderer after 22 Years
बदला पुरा! वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी २२ वर्ष वाट पाहिली, मोठा होताच त्याचपद्धतीने केली मारेकऱ्याची हत्या
Delhi Crime Case Doctor Murder
Delhi Doctor Murder Case : विवाहबाह्य संबंध, लग्नाचं आमिष अन् हत्या; दिल्लीतील हत्याप्रकरणी डॉक्टर, नर्स आणि अल्पवयीन मुलामधील संबंधांचा उलगडा!
Stop Violence on Bangladesh Hindus
Video: “बांगलादेशी हिंदूंवर…”, अमेरिकेच्या आकाशात झळकला भला मोठा बॅनर
Kim Jong-un nuclear Attack Reuters
Kim Jong-un : इस्रायल-इराण, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान किम जोंग-उनची आण्विक हल्ल्याची धमकी, ‘या’ देशाची चिंता वाढली

न्यायालयाने श्रेथा यांच्याविरोधात ५-४ मत दिले. या निर्णयाने त्यांना ताबडतोब पदावरून हटवण्यात आले. थाई संसदेने नवीन पंतप्रधान नियुक्त करेपर्यंत काळजीवाहू तत्त्वावर मंत्रिमंडळ कायम राहणार आहे. निकालाच्या काही वेळानंतर गव्हर्नमेंट हाऊसमध्ये बोलताना श्रेथा यांनी स्वत:चा बचाव करण्याची संधी दिल्याबद्दल न्यायाधीशांचे आभार मानले. ‘न्यायालयाच्या निर्णयाचा आदर आहे आणि एक वर्षापेक्षा कमी कार्यकाळात नेहमीच नैतिकतेने वागण्याचा प्रयत्न केला, असे श्रेथा यांनी सांगितले. दरम्यान, ‘श्रेथा फेउ थाई’ पक्षाचे फुमथम वेचायचाई हे पंतप्रधानपद भूषवण्याची शक्यता आहे. फुमथम हे प्रथम उपपंतप्रधान आणि श्रेथा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये वाणिज्य मंत्री होते.