वृत्तसंस्था, बँगकॉक

थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना नैतिकतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने बुधवारी पदावरून हटवले. एक आठवड्यापूर्वी थायलंडमधील मुख्य विरोधी पक्ष विसर्जित करण्याचे आदेश दिले होते. आता न्यायालयाच्या पंतप्रधानांवरील कारवाईच्या आदेशाने थाई राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयीन अधिकाऱ्याला लाच देण्याचा कथित प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केलेल्या मंत्रिमंडळातील सदस्याच्या नियुक्तीवरून हा निर्णय घेतला.

India Expels 6 Canadian Diplomats
India vs Canada : कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश; कॅनडा व्होट बँक पॉलिटिक्स करत असल्याचा आरोप
Tesla Car Accident
Tesla Car Accident : टेस्ला कारचा भीषण अपघात,…
Dwarka court judge standing on chair yelling
“इन्हें कस्टडी में लो और…”, खुर्चीवर उभे राहून ओरडणाऱ्या न्यायाधीशाचं निलंबन, पाहा VIDEO
Delhi Firecrackers Ban
Delhi Firecrackers Ban : दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; फटाके फोडण्यासह विक्रीवरही जानेवारीपर्यंत बंदी
Lawrence Bishnoi vs Salman Khan
Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिष्णोई सलमान खानच्या मागे हात धुवून का लागलाय? वाचा २६ वर्षांचा घटनाक्रम
Lawrence Bishnoi Gang 10 Targets
Lawrence Bishnoi : सलमान खानप्रमाणे ‘हे’ १० जण बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर, NIA समोर लॉरेन्सनेच दिलेली कबुली
Sanjay Singh Gangwar
Sanjay Singh Gangwar : Video : “गायीच्या गोठ्यात झोपलं तर कर्करोग बरा होतो, तर ब्लड प्रेशर…”, भाजपा नेत्याच्या विधानाची चर्चा
Long-standing consensual adulterous relationship not rape
“पती त्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणार नाही, तर मग..?” ; उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत काय म्हटलंय?
India On Canada
India On Canada: ‘ट्रूडो सरकारचा हा राजकीय अजेंडा’, भारताने कॅनडाला पुन्हा एकदा फटकारलं; नेमके कारण काय?

न्यायालयाने श्रेथा यांच्याविरोधात ५-४ मत दिले. या निर्णयाने त्यांना ताबडतोब पदावरून हटवण्यात आले. थाई संसदेने नवीन पंतप्रधान नियुक्त करेपर्यंत काळजीवाहू तत्त्वावर मंत्रिमंडळ कायम राहणार आहे. निकालाच्या काही वेळानंतर गव्हर्नमेंट हाऊसमध्ये बोलताना श्रेथा यांनी स्वत:चा बचाव करण्याची संधी दिल्याबद्दल न्यायाधीशांचे आभार मानले. ‘न्यायालयाच्या निर्णयाचा आदर आहे आणि एक वर्षापेक्षा कमी कार्यकाळात नेहमीच नैतिकतेने वागण्याचा प्रयत्न केला, असे श्रेथा यांनी सांगितले. दरम्यान, ‘श्रेथा फेउ थाई’ पक्षाचे फुमथम वेचायचाई हे पंतप्रधानपद भूषवण्याची शक्यता आहे. फुमथम हे प्रथम उपपंतप्रधान आणि श्रेथा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये वाणिज्य मंत्री होते.