Thailand school shooting Incident: थायलंडमधील एका शाळेत १८ वर्षीय बंदूकधारी तरुणाने बेछूट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हल्लेखोराने काही विद्यार्थी आणि शिक्षकांना ओलीस ठेवले होते. पण, पोलिसांनी केलेल्या कारवाईत हल्लेखोराला गोळी लागली, यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने ओलीस ठेवलेले सर्व शिक्षक आणि विद्यार्थी सुखरुप असून, त्यांची सुटका करण्यात आल्याचे वृत्त ‘एएफपी’ने दिले आहे. दक्षिण थायलंडमधील सोंगखला प्रांतात बुधवारी (११ फेब्रुवारी) ही घटना घडली.
शाळेत घुसून गोळीबार
दक्षिण थायलंडमधील सोंगखला प्रांतातील हात याई (Hat Yai) जिल्ह्यातील ‘फातोंग प्रधान खिरीवात’ (Phatong Prathan Khiriwat) शाळेत ही घटना घडली. हल्लेखोराने शाळेत घुसून गोळीबार केला, अशी माहिती का पोलीस अधिकाऱ्याने एएफपी वृत्तसंस्थेला दिली.
गोळीबार आणि ओलीस नाट्य
१८ वर्षीय बंदूकधारी तरुण शाळेत घुसला, शाळेत प्रवेश करताच त्याने दोन ते तीन गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू आल. त्यानंतर त्याने काही विद्यार्थी आणि शिक्षकांना एका खोलीत बंद करुन ओलीस ठेवले.
पोलिसांची कारवाई
हाते याई गोळीबार शाळेतील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी १८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. शाळेतून जखमी अवस्थेत ताब्यात घेण्यात आले. प्युटी सुप्रीटेंडंट विचिआन सोबून यांनीही हल्लेखोराला पकडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे सांगितले.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
गोळीबाराच्या या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. यामध्ये जीव वाचवण्यासाठी विद्यार्थी आणि इतर कर्मचारी शाळेच्या परिसरातून सैरावैरा धावताना आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घेताना दिसत आहेत.
तिघे जखमी
शाळेतील गोळीबाराच्या या घटनेत एकूण तिघे जण जखमी झाले आहेत. यामध्ये एका महिलेचा आणि १४ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
