वडीलांना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर बालपणीचा फोटो पोस्ट करत अदर पूनावालांची भावनिक पोस्ट, म्हणाले, “या वर्षी…”

सायरस पूनावाला हे करोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

Adar Poonawala and Cyrus Poonawala
अदर पूनावाला यांनी ट्विटरवरुन व्यक्त केल्या भावना

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने १२८ पद्म पुरस्कारांची घोषणा केली़ त्यात राज्यातील दहा जणांचा समावेश आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘टाटा’सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन आणि ‘पूनावाला उद्योग समूहा’चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सायरस पूनावाला हे करोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे पुत्र म्हणजेच अदर पूनावाला यांनी स्वत:च्या बालपणीचा एक फोटो पोस्ट करत आपल्या भावाना व्यक्त केल्यात.

पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर सायरस पूनावाला यांनी, “देशाच्या जडणघडणीत अनन्यसाधारण योगदान देणाऱ्या दिग्गजांच्या बरोबर पद्म किताबाचा मानकरी ठरणे हा माझा बहुमान आहे. भारत सरकारला मी मन:पूर्वक धन्यवाद देतो. आरोग्य हा समाजाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. सर्वाना समान आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन,” असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. सायरस पूनावाला यांनी पुण्यातील हडपसर परिसरात १९६६ साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. तेव्हापासून ही संस्था देशामधील लसीनिर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या संस्थांपैकी एक आहे.

सायरस पूनावालांबरोबरच सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सायरस यांचे पुत्र अदर पुनावाला यांनी ट्विटरवरुन आपल्या भावाना व्यक्त केल्यात. “या वर्षी पद्म पुरस्कार मिळवणाऱ्या सर्व व्यक्तींचं मी मनापासून अभिनंदन करतो,” असं अदर पूनावाला यांनी ट्विटच्या सुरुवातील म्हटलं आहे. सर्व १२८ पुरस्कार विजेते हो खरोखरच पुरस्कारासाठी पात्र आहेत, असा उल्लेखही त्यांनी ट्विटमध्ये केलाय. वडीलांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अदर पुनावाला यांनी आनंद व्यक्त करताना सरकारचेही आभार मानलेत.

नक्की वाचा >> “माझ्या बॅचमेटला पद्मविभूषण मिळाल्याने…”; पद्म पुरस्कारांच्या घोषणेनंतर क्वारंटाइन असणाऱ्या शरद पवारांचं ट्विट

“मी भारत सरकारचे आभार मानू इच्छितो. त्यांनी माझे मार्गदर्शक, माझे हिरो, माझे वडील डॉक्टर सायरस पूनावाला यांच्या कामाची दखल घेतली,” असं अदर पूनावाला म्हणाले आहेत. या ट्विटसोबत अदर पूनावाला यांनी एक जुना फोटो ट्विट केला आहे. यामध्ये अदर हे अगदीच एक दीड वर्षांचे असल्याचं दिसत आहे. फोटोमध्ये विलू सायरस पूनावाला यांच्या कुशीत असणारा चिमुकला मुलगाच अदर पुनावाला आहेत. अदर यांचे वडील सायरस हे हसत आपल्या मुलाकडे पाहताना या फोटोत दिसत आहे.

पूनावाला सहा दशकांहून अधिक काळ औषध निर्मिती क्षेत्रामध्ये
सायरस पूनावाला यांनी हडपसरमध्ये १९६६ साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. सायरस पूनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लस निर्मितीसाठी केला जातो. त्यातूनच सायरस पूनावाला यांनी लस निर्मितीक्षेत्रात पाऊल टाकले. ‘सीरम’ ही विविध आजारांवरील लस निर्माण करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.

‘सीरम इन्स्टिट्यूट’कडून सध्या पोलिओ, डायरीया, हेपिटायटस, स्वाईन फ्ल्यू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. वेगवेगळ्या आजारांवर ज्या लसींचा उपयोग केला जातो, त्यापैकी ६० टक्क्यांहून अधिक लसी या ‘सीरम’मध्ये तयार केल्या जातात. ‘सीरम इन्स्टिट्यूट’ ही करोना प्रतिबंधक लस असणाऱ्या कोव्हिशिल्डच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहचली असली तरी मागील सहा दशकांहून अधिक काळापासून सायरस पूनावाला हे या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thank govt for acknowledging my mentor my hero adar poonawalla on his father being conferred with padma bhushan scsg

Next Story
“भारताला कलामांसारख्या देशभक्ताची गरज आहे, जिनांसारख्या देशद्रोह्यांची नाही”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी