पीटीआय, वॉशिंग्टन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमेरिकेचा सुवर्णकाळ आता परत येणार असून देशाच्या ‘जखमा’ आपण भरणार असल्याचे माजी आणि भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी नागरिकांना दिले. आपल्याला मिळालेले जनमत हे अद्वितीय आणि प्रबळ असल्याची ग्वाहीदेखील ट्रम्प यांनी दिली.

मतदानोत्तर चाचण्यांमध्ये प्रतिनिधीवृंदामधील आवश्यक २७० पेक्षा अधिक मते मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ट्रम्प हे पत्नी मेलेनिया, अन्य कुटुंबीय, प्रचार मोहिमेतील वरिष्ठ अधिकारी आणि उपाध्यक्ष जे. डी. वान्स, त्यांच्या पत्नी उषा वान्स यांच्यासह फ्लोरिडामधील पाम बिच येथे जमलेल्या हजारो समर्थकांना सोमारे गेले. भावी अध्यक्ष म्हणून केलेल्या पहिल्या भाषणात त्यांनी विजयाला हातभार लावलेल्या प्रत्येकाचे आणि अमेरिकन जनतेचे आभार मानले. अमेरिकेला पुन्हा महान बनविण्यासाठी झालेला हा शानदार विजय आहे, अशा शब्दांत त्यांनी जनमताचा स्वीकार केला. अमेरिकेने अभूतपूर्व कौल दिला असून आपण (रिपब्लिकन पक्षाने) सिनेटही (वरिष्ठ प्रतिनिधीगृह) पुन्हा ताब्यात घेतल्याचे सांगत घुसखोरीचा बंदोबस्त करणार असल्याचा निर्धार ट्रम्प यांनी बोलून दाखविला. आपल्या छोटेखानी भाषणात नियोजित उपराष्ट्राध्यक्ष वान्स म्हणाले, की ट्रम्प यांचा विजय हे राजकारणातील सर्वांत दमदार पुनरागमन आहे.