जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत असणारे रविंद्र गुप्ता आहेत तरी कोण?

टाइम मॅगझिननं २०२० च्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी केलाय रविंद्र यांचा समावेश

(फोटो सौजन्य : टाइम्स डॉट कॉमवरुन Jane Stockdale—The New York Times/Redux)

टाइम मॅगझिननं २०२० च्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी टाइम मॅगझिनकडून ही यादी जारी करण्यात येते. या यादीत जभरातील निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला जातो. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, अभिनेता आयुष्यमान खुराना, शाहीन बाग परिसरातील आंदोलनात सामिल असलेल्या बिल्किस यांचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये भारतीय प्राध्यापक रविंद्र गुप्ता यांचाही समावेश करण्यात आला आहे. इतर सर्वांची नाव तशी परिचयाची असली तरी गुप्ता यांचे नाव अनेकांनी पहिल्यांदाच ऐकले आहे. कोण आहेत हे प्राध्यापक गुप्ता, टाइमने त्यांच्याबद्दल काय म्हटलं आहे आणि नक्की त्यांचा कोणत्या कार्यासाठी या यादीमध्ये समावेश करण्यात आलाय हेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

प्राध्यापक गुप्ता हे त्यांनी एचआयव्हीवर केलेल्या संशोधनासाठी ओळखले जातात. गुप्ता यांच्याबद्दल टाइम मॅगझिनमध्ये अ‍ॅडम्स अ‍ॅस्टील्जो यांनी लेख लिहिला आहे. अ‍ॅडम्स हे लंडनमधील गृहस्थ असून त्यांच्यावर गुप्ता यांनी संशोधन केलेल्या पद्धतीनुसार उपचार करण्यात आले आहेत. फंक्शनल एचआयव्ही क्युअर असं या पद्धतीचं नाव असून या माध्यमातून एचआयव्ही मुक्त झालेले अ‍ॅडम्स हे दुसरे रुग्ण आहेत. “फंक्शनल एचआयव्ही क्युअर उपचार पद्धतीसंदर्भातील माझा अशक्य वाटणारा प्रवास प्राध्यापक रविंद्र गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. माझ्या आयुष्यामध्ये अनेक संकटे येत असतानाच माझा हा प्रवास सुरु झाला होता. मात्र मी जेव्हा गुप्ता यांना पहिल्यांना भेटलो तेव्हा मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ते खूपच विचारपूर्वक आणि दयाळू असल्याचे मला जाणवले. ते खूपच कर्तबगार आहेत. त्यांच्या मदतीमुळेच मला स्टेम सेल उपचारासाठी एका दात्याकडून मदत मिळाली. त्यांच्या याच स्वभावामुळे एचआयव्हीसंदर्भात संशोधन करणाऱ्या क्षेत्रामध्ये त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून आणि सर्वांकडून मानसन्मान मिळतो. त्यांचा आदर वाटणाऱ्यांमध्ये आता माझाही समावेश झाला आहे,” असं अ‍ॅडम्स यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.

“मागील काही वर्षांमध्ये आमच्यातील नातं आणखीन घट्ट झालं आहे. गुप्ता हे त्यांच्याकडील ज्ञान आणि माहिती ही सर्वांसाठी परिणामकारक उपचार पद्धती शोधता यावी यासंदर्भात उत्साहाने काम करण्यासाठी वापरतात. त्यांनीच मला एचआयव्हीवर मात मिळवण्यात मदत केली. त्यांनीच मला आत्मविश्वास मिळवून दिला. आज जगभरामध्ये एचआयव्हीशी लढणाऱ्यांसाठी माझासारखा या आजाराला हरवून बरा झालेला रुग्ण आदर्श आहे. मात्र आज मी गुप्ता यांच्यामुळेच हे करु शकलो आहे,” असं अ‍ॅडम्स म्हणतात.

“गुप्ता यांनी एचआयव्ही उपचार पद्धतीसंदर्भात केलेल्या संशोधनाच्या कामासाठी मागील वर्षी केंब्रिज विद्यापिठाने त्यांना केंब्रिज इन्स्टिट्यूट ऑफ थेरिप्युटीक इम्युनोलॉजी अ‍ॅण्ड इन्फेक्शियस डिसिजेस विभागामध्ये क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केलं आहे. मी त्यांना ओळखतो यासाठी स्वत:ला खूप नशिबवान समजतो. तसेच आपल्या ध्येयशक्तीच्या जोरावर ते या आजारावर ज्यापद्धीने मात करण्यासाठी काम करत आहेत ते प्रेरणादायी आहे,” असं अ‍ॅडम्स सांगतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The 100 most influential people of 2020 who is professor ravindra gupta scsg

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या