दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी गाझीपूर फुलबाजारातून जप्त केलेल्या इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइस (आयईडी) संदर्भातील तपासात असे दिसून आले आहे की, पाकिस्तानमधून भारतात पाठवलेल्या २४ बॉम्बपैकी हा एक होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जम्मू आणि काश्मीर आणि पंजाबमध्ये अलीकडेच जप्त करण्यात आलेली इतर उपकरणे त्याच मालाचा भाग असल्याचे मानले जाते आणि असेही मानले जाते की काही उपकरणांची गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये तस्करी झाली असावी.

नाव न सांगण्याच्या अटीवर दिल्ली पोलिसांच्या एका उच्च तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, गाझीपूर डिव्हाईस एक टिफीन बॉम्ब होता. ज्यामध्ये तीन किलोग्रॅम आरडीएक्स न्यूक्लियर चार्ज आणि सेंकडरी चार्ज म्हणून अमोनियम नायट्रेट होता.

Video: राजधानी दिल्लीत अनर्थ टळला; गाझीपूरमध्ये सापडली प्रचंड क्षमतेची स्फोटकं

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार हे आयडी सीमेच्या पलीकडून भारतातील स्लीपर्स मॉड्यूल्ससह काही गुन्हेगारी टोळ्यांमध्ये तस्करी करून आणले गेले होते. सप्टेबर २०२१ मध्ये मुंबई, लखनऊ, अलाहबाद आणि दिल्ली मधील अटकसत्रासोबतच दिल्ली पोलिसांकडून उद्धवस्त करण्यात आलेल्या दहशतवादी मॉड्यूलला या आयडीच्या जप्तीशी जोडले गेले आहे. दिल्ली पोलिसांच्या मते ही आयडीची खेप भारतात प्रजासत्ताक दिनाच्या आसपासच पोहचली होती. दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा अन्य आयडी जप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत.

नक्की घडलं काय?

पूर्व दिल्लीतल्या गाझीपूर फूल बाजारात एक बेवारस बॅग आढळून आली होती. या बॅगबद्दलची प्राथमिक माहिती पोलिसांना देण्यात आली. याची माहिती मिळताच पोलिसांनी बॅग आढळलेला परिसर रिकामा केला आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला घटनास्थळी बोलावून घेतलं. हे पथक आल्यानंतर त्यांनी जेसीबी मागवून एक खोल खड्डा खणून बॉम्ब निकामी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The bomb found in ghazipur was one of 24 bombs sent to india from pakistan msr
First published on: 17-01-2022 at 10:15 IST