scorecardresearch

Premium

‘भारतातील बीबीसीचा व्यवसाय आणि उत्पन्नाचे प्रमाण जुळत नाही’; केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा दावा

बीबीसीचे भारतातील कामकाज आणि त्यांचे उत्पन्न, नफा यांचा एकमेकांशी मेळ बसत नाही असा दावा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीडीबीटी) केला आहे.

bbc
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

पीटीआय, नवी दिल्ली

बीबीसीचे भारतातील कामकाज आणि त्यांचे उत्पन्न, नफा यांचा एकमेकांशी मेळ बसत नाही असा दावा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीडीबीटी) केला आहे. बीबीसीच्या काही परकीय संस्थांनी केलेल्या काही विशिष्ट निधी हस्तांतरणांवर कर भरला गेलेला नाही, आयकर विभागाने यासंबंधी अनेक पुरावे गोळा केले आहेत, असे सीडीबीटीने स्पष्ट केले आहे.

Aai- women centric tourism policy Government help women tourism business
पर्यटनाचा व्यवसाय निवडायचाय? शासन करेल मदत
union minister kumar mishra in satara for bjp contact campaign remark on ajit pawar
Video : अजित पवार महायुतीमध्ये आल्यामुळे भाजपला काही फरक पडत नाही-अजय कुमार मिश्रा
female-police-officers
केंद्रीय मंत्रिमंडळात फक्त १४ टक्के महिला; न्यायालय, पोलिस दल आणि इतर क्षेत्रात प्रमाण किती?
Chagan bhujbal loksatta office
जातनिहाय जनगणना आवश्यकच!; छगन भुजबळ यांचे ठाम मत; ‘मराठा आरक्षणाचा निर्णय केंद्राच्या हाती’

आयकर विभागाने बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयांमध्ये ‘सर्वेक्षण’ केले. मंगळवार ते गुरुवार असे तीन दिवस ही कारवाई सुरू होती.
सीडीबीटीने शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध करून याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. मात्र त्यामध्ये बीबीसीचा उल्लेख केलेला नाही. त्याऐवजी इंग्रजी, हिंदूी आणि भारतीय भाषांमध्ये आशय निर्मिती करण्याच्या व्यवसायातील प्रमुख आंतरराष्ट्रीय माध्यम कंपनी असे वर्णन करण्यात आलेले आहे. बीबीसीच्या इंग्रजीव्यतिरिक्त अनेक भाषांमधील आशयाची लक्षणीय प्रमाणात विक्री होत असली तरी त्यांनी दाखवलेले उत्पन्न त्याच्याशी जुळत नाही, असे सीडीबीटीचे म्हणणे आहे.

कारवाईदरम्यान, कंपनीने बराच वेळकाढूपणा केला असे नमूद करून बीबीसीवर सहकार्य न केल्याचा आरोप अप्रत्यक्षपणे करण्यात आला आहे. तर, आयकर विभागाशी यापुढेही सहकार्य करत राहू, हे प्रकरण लवकरात लवकर निवळेल अशी आशा आहे असे बीबीसीकडून सांगण्यात आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The central board of direct taxes claims that bbc business and income in india do not match amy

First published on: 18-02-2023 at 03:33 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×