पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राम मंदिराच्या प्रस्तावावर भाषण करत आहेत. १७ व्या लोकसभेचं हे १५ वं अधिवेशन आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अंतरिम असून १७ वी लोकसभा लवकरच विसर्जित करण्यात येणार आहे. दरम्यान, या १७ व्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी सर्व खासदार आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“१७ व्या लोकसभेच्या पाच वर्षांत आपण आपला वेळ राष्ट्रासाठी समर्पित केला. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या संकल्पांना राष्ट्राच्या चरणांत समर्पित करण्याची ही वेळ आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“या पाच वर्षांत देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म पाहिलं. रिफॉर्मपासून परफॉर्म आणि परफॉर्मपासून ट्रान्सफर्म पाहता येणं हे खूप दुर्मिळ आहे. एक नवा विश्वास तयार होत आहे. हे सर्व १७ व्या लोकसभेपासून आज देश अनुभव करत आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की देश १७ व्या लोकसभेला नक्कीच लक्षात ठेवेल”, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >> मोदींचं ४०० जागांचं स्वप्न भंगणार? इंडिया आघाडीला किती जागा मिळणार? वाचा ओपिनिअन पोलचे अंदाज काय सांगतात

सभागृहाची उत्पादकता वाढली

“या सर्व प्रक्रियांमध्ये सदनच्या सर्व माननीय सदस्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. त्यामुले मी गृहनेता आणि तुमचा सहकारी म्हणून तुमचे अभिनंदन करतो, असंही मोदी म्हणाले. तसंच, या सभागृहाची उत्पादकता जवळपास ९० टक्के होती”, असंही मोदींनी स्पष्ट केलं.

मी अध्यक्षांप्रतीही हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो असं म्हणत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आभार मानले. ओम बिर्ला सतत हसतमुख चेहऱ्याने सामोरे गेले. सभागृहात काहीही झालं तर त्यांचा चेहरा सतत हसतमुख असत. प्रत्येक परिस्थिती संतुलित राहून त्यांनी निष्पक्षपणे नेतृत्त्व केले”, असंही ते म्हणाले.

“नव्या संसदेबाबत सर्वांनी याआधी खूपवेळा चर्चा केली. पण कोणीच नवं संसद तयार केलं नाही. पण तुमच्या नेतृत्त्वाने निर्णय दिला आणि निर्णयाला पुढे पाठवलं आणि परिणामी देशाला नवे संसद भवन प्राप्त झाले आहे”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेचंही श्रेय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The countrys 17th lok sabha will be remembered forever modis emotional speech in the budget session sgk
First published on: 10-02-2024 at 17:21 IST