पीटीआय, नवी दिल्ली

भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या कुस्तीगीरांनी मंगळवारी पदके गंगा नदीमध्ये विसर्जित करण्याचा निर्णय भारतीय किसान संघटनेने समजूत घातल्यानंतर अखेरच्या क्षणी मागे घेतला. त्याचवेळी कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण यांच्यावरील कारवाईबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला आणखी पाच दिवसांची मुदत दिली आहे.

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Prime Minister Modi criticism of Rahul gandhi Lalu Prasad Yadav regarding meat
श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

ब्रिजभूषण यांना अटक करण्यासाठी भारतीय कुस्तीगीर एका महिन्याहून अधिक काळ जंतरमंतरवर आंदोलन करीत होते. रविवारी निदर्शकांची धरपकड करत दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतरमंतरवरून हटविले. सात तास चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले असले तरी काही आघाडीच्या कुस्तीगिरांसह अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता कुस्तीगिरांनी मंगळवारी सकाळी आपली पदके गंगेमध्ये विसर्जित करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया हे कुस्तीगीर संध्याकाळी पदकांसह हरिद्वारच्या गंगा काठावर पोहोचले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी शेकडो पाठिराखेही हरिद्वारला पोहोचले होते. कुस्तीगीर तासभराहून अधिक काळ पदके हातात धरून बसले होते. प्रत्येकाच्या डोळय़ात अश्र होते. त्यामुळे वातावरण भावनात्मक झाले होते. या वेळी भारतीय किसान संघटनेचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी मध्यस्थीकरून कुस्तीगीरांना पदक विसर्जित करण्यापासून रोखले. टिकैत यांनी कुस्तीगीरांची समजूत काढली आणि त्यांच्याकडून पदके आपल्याकडे घेतली. त्यानंतर सरकारला ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पाच दिवसांची मुदत देत असल्याचे कुस्तीगिरांनी जाहीर केले.

‘इंडिया गेट’वर परवानगी नाहीच

पदकांचे विसर्जन केल्यानंतर नवी दिल्लीतील ‘इंडिया गेट’समोर आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा आंदोलक कुस्तीगिरांनी केली होती. मात्र दिल्ली पोलिसांनी इंडिया गेटसमोर उपोषणास बसू देणार नसल्याचे स्पष्ट केले. इंडिया गेट हे राष्ट्रीय स्मारक आहे. तेथे आंदोलन करता येणार नाही. कुस्तीगिरांनी आंदोलनासाठी दुसरे स्थान शोधावे असे पोलिसांनी सांगितले.