“शेतकऱ्यांचे तंबू बळजबरी हटवले तर सरकारी कार्यालयात… ” ; राकेश टिकैत यांचा इशारा!

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरूच आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरूच आहे. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असून, दिल्लीच्या सीमेवर त्यांनी ठिय्या दिलेला आहे. दरम्यान, आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रशासनाला एक सूचक इशारा देखील दिला आहे.

“प्रशासन जेसीबीच्या सहाय्याने येथील तंबू हटवण्याचा प्रयत्न करत असल्याची आम्हाला माहिती मिळाले आहे. जर त्यांनी तसे केले तर शेतकरी पोलीस स्टेशन, डीएम कार्यालयात तंबू लावतील.”, असं राकेश टिकैत म्हणाले आहेत.

दिल्लीच्या गाझीपूर आणि टीकरी बॉर्डरवरून बॅरीकेड्स हटवण्याबाबत आणि मार्ग पूर्णपणे मोकळा करण्याबद्दल शेतकरी नेते आणि पोलीस प्रशासनातील वादाच्या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत यांनी हा इशारा दिला आहे. टिकैत म्हणाले की, जर पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांना बळजबरी हटवले गेले तर आम्ही सरकारी कार्यालयांना धान्य बाजार बनवू.

दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी लावलेले बॅरिकेट्स पोलिसांनी हटवले, राकेश टिकैत म्हणाले…

दिल्ली पोलिसांनी गुरूवारी रात्रीपासून गाझीपीर आणि टीकरी सीमेवरील बॅरीकेड्स हटवणं सुरू केलं आहे. ज्या ठिकाणी शेतकीर प्रदीर्घ काळापासून आंदोलन करत आहेत. जवळपास वर्षभरापासून हे मार्ग बंदच आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The farmers will set up their tents at police stations dm offices rakesh tikait msr

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या