पीटीआय, बीजिंग : चीनमध्ये करोनाच्या ओमायक्रॉन उत्परिवर्तनाच्या नव्या वेगाने पसरणाऱ्या विषाणूमुळे रुग्णसंख्या वाढत असतानाच सोमवारी आणखी दोन करोनाबळींची नोंद झाली. अडीच कोटी लोकसंख्येच्या बीजिंग शहरात बहुसंख्य लोकांना या विषाणूची लागण झाली असून त्यात परदेशी दूतावासांचे अधिकारी- कर्मचारी यांचाही समावेश आहे. यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे.

  चीनच्या शून्य करोना धोरणाविरोधात नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर निदर्शने केल्यानंतर अनेक करोना निर्बंध शिथिल करण्यात आले. तेव्हापासून प्रथमच अधिकृतपणे या करोना मृत्यूंची माहित देण्यात आली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या शहरांत सध्या ओमायक्रॉनची बीए.५.२ आणि बीएफ.७ ही उत्परिवर्तने वेगाने पसरत आहेत. बीजिंगमध्ये बीएफ.७ प्रकारचा विषाणू पसरत असून तो करोनाचा सर्वात वेगाने पसरणारा विषाणू असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. शहरातील ७० टक्के नागरिकांना या विषाणूची बाधा झाल्याने काही लाख लोक घरातच अडकून पडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय