पीटीआय, इस्लामाबाद : अफगाणिस्तानातील तालिबान प्रशासनाने बुधवारी हत्या प्रकरणातील एका दोषीला फाशी दिली. गेल्या वर्षी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून ही पहिलीच सार्वजनिक फाशी आहे. या व्यक्तीला फाशी दिल्याने अफगाणिस्तानातील तालिबान शासकांनी २०२१ मध्ये देश ताब्यात घेतल्यापासून लागू केलेली कठोर धोरणे सुरू ठेवण्याचा आणि इस्लामिक कायदे किंवा शरिया लागू करण्याचा त्यांचा हेतू अधोरेखित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशाची राजधानी काबूल आणि या प्रांतातील शेकडो नागरिक आणि अनेक तालिबान अधिकाऱ्यांसमोर या व्यक्तीला फाशी देण्यात आली, असे तालिबान सरकारचा मुख्य प्रवक्ता जबिहुल्ला मुजाहिद याने सांगितले. देशाच्या तीन सर्वोच्च न्यायालयांनी आणि तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा याच्या मान्यतेनंतर शिक्षेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे मुजाहिद म्हणाला. ताजमीर असे फाशी देण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून पाच वर्षांपूर्वी  मुस्ताफा नावाच्या व्यक्तीची हत्या करून त्याची मोटारसायकल आणि मोबाइल चोरल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The first public execution in afghanistan since taliban took over ysh
First published on: 08-12-2022 at 00:02 IST