71th Republic Day 2020 : प्रजासत्ताक दिन हा संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून नावारुपाला आला. पण देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन कसा साजरा झाला असेल असा कधी तुम्हाला प्रश्न पडला का? २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी गव्हर्नमेंट हाऊसच्या दरबार हाऊसमध्ये पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. १९५०, १९५२ साली साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ एका युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आले आहेत.

mayawati west up statehood
उत्तर प्रदेशचा तुकडा पडणार? मायावतींचे पश्चिम उत्तर प्रदेशाचे आश्वासन
UPSC 2023 Topper Aditya Srivastava
अडीच लाख महिना पगार सोडून UPSC ची तयारी केली आणि थेट देशात पहिला आला; आदित्य श्रीवास्तवचा अविश्वसनीय प्रवास!
owaisi apana dal pdm
अखिलेश यांच्या ‘पीडीए’ सूत्राला ओवेसींचे ‘पीडीएम’ देणार टक्कर? उत्तर प्रदेशात तिसरी आघाडी
Anant Goenka and Minister Piyush Goyal
‘तेजांकित’ तरुणच देशाचे भविष्य, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन; ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ विजेत्यांचे विशेष कौतुक

६ मिनिटे २८ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि इतर काही अधिकारी पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे सैन्यदल आणि रणगाड्यांचे प्रात्यक्षिके पाहायला मिळत आहेत.

Republic Day 2023: आदिशक्तीचा उदो उदो; महाराष्ट्राच्या चित्ररथात गाजला नारीशक्ती आणि देवीचा गजर, पाहा Video

विश्लेषण: प्रजासत्ताक दिनाचा चित्ररथ नेमकं कोण घडवतं? महाराष्ट्राची यंदाची थीम नेमकी काय असणार?

तर आणखी एका व्हिडिओत लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये कशाप्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा झाला हे पाहायला मिळत आहे. यामध्ये भारताचे ब्रिटनमधले पहिले उच्चायुक्त व्ही. के. कृष्ण मेनन पुन्हा एकदा शपथ घेऊन भाषण देत आहेत.