Premium

G20 Summit 2023: ‘पाश्चिमात्यांचा हेतू फोल’; रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून भारताचे कौतुक 

Delhi G20 Summit 2023 Updates युक्रेन मुद्दय़ावरून संपूर्ण शिखर परिषद ताब्यात घेण्याचा पाश्चिमात्य देशांचा हेतू आम्ही फोल ठरवला, अशी आक्रमक प्रतिक्रिया रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गे लाव्हरोव्ह यांनी रविवारी ‘जी-२०’च्या शिखर परिषदेच्या सांगता समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

Sergey Lavrov
सर्गे लाव्हरोव्ह, रशियाचे परराष्ट्रमंत्री

नवी दिल्ली : G20 Summit Delhi 2023 दिल्लीतील ‘जी-२०’ समूहाची शिखर परिषद अत्यंत यशस्वी झाली. युक्रेन मुद्दय़ावरून संपूर्ण शिखर परिषद ताब्यात घेण्याचा पाश्चिमात्य देशांचा हेतू आम्ही फोल ठरवला, अशी आक्रमक प्रतिक्रिया रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गे लाव्हरोव्ह यांनी रविवारी ‘जी-२०’च्या शिखर परिषदेच्या सांगता समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. दिल्ली घोषणापत्रात रशियाचा उल्लेख न झाल्याने संतुष्ट झालेल्या लाव्हरोव्ह यांनी भारताच्या ‘जी-२०’तील कामगिरीचे कौतुक केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘भारत मंडलम’मधील शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी, शनिवारी दिल्ली घोषणापत्र एकमताने स्वीकारण्यात आले. या घोषणापत्रामध्ये युक्रेन संघर्षांवर सहा परिच्छेद खर्ची घालण्यात आले असले तरी, रशियाचा थेट उल्लेख टाळण्याचा आला आहे. गेल्या वर्षी इंडोनेशियातील बाली शिखर परिषदेमधील घोषणापत्रात पाश्चिमात्य देशांच्या दबावामुळे युक्रेनविरोधात रशियाने युद्ध छेडल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. दिल्ली घोषणापत्रात उल्लेख न केल्याने रशियाचे हितसंबंध जपले गेल्याचे मानले जात आहे. त्याची अप्रत्यक्ष कबुली  लाव्हरोव्ह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा >>> जी २० शिखर परिषदेची सांगता, नरेंद्र मोदींनी ‘या’ देशाकडे सोपावली पुढील अध्यक्षपदाची जबाबदारी

युक्रेन मुद्दय़ावरून पाश्चिमात्य देशांना शिखर परिषद दावणीला बांधता आली नाही. जी-२० शिखर परिषद युक्रेनमय करण्याचा पाश्चात्य देशांचा हेतू फोल ठरवण्यात आम्ही यशस्वी झालो. ‘जी-२०’ समूहावर आता पाश्चिमात्य देशांचे वर्चस्व राहू शकणार नाही. जगात नवे सत्ताकेंद्र निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. वैयक्तिक लाभासाठी जी-२० व्यासपीठाचा कुठल्याही देशाने दुरुपयोग करू नये. – सर्गे लाव्हरोव्ह, रशियाचे परराष्ट्रमंत्री

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The foreign countries intention was false appreciation of india by russian foreign minister sergey lavrov ysh

First published on: 11-09-2023 at 03:40 IST
Next Story
भाजपला हिंदू धर्माशी देणेघेणे नाही!, राहुल गांधींची पॅरिसमध्ये टीका