उन्हाळ्याची झळ आता आपल्याला चांगलीच जाणवायला लागली आहे. या उष्णतेपासून वाचण्यासाठी अनेकजण उन्हाळ्याच्या सुट्टीत थंड हवेच्या ठिकाणी जाण्याच्या योजना आखत असतील. परंतु त्याआधी ही बातमी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. विक्रमी बर्फवृष्टीनंतर हिमाचल प्रदेशातील उष्णतेने जुने रेकॉर्डही नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. हिमाचलच्या पर्यटन स्थळांमध्ये मार्च महिन्यातच उष्णतेने यापूर्वीचे अनेक विक्रम मोडले आहेत. मैदानी भागातील उन्हापासून वाचण्यासाठी पर्यटक डोंगराकडे वळतात, मात्र मार्चमध्येच डोंगर तापू लागले आहेत. हिमाचलमधील प्रमुख पर्यटन स्थळे शिमला, मनाली आणि धर्मशाला येथे मार्चच्या मध्यातच उष्णतेने १२ ते १८ वर्षांचा विक्रम मोडला आहे.

शिमला हवामान विभागाचे वैज्ञानिक संदीप कुमार शर्मा यांनी सांगितलं की यावेळी शिमलामध्ये १७ मार्चला किमान तापमान १८ अंश सेल्सिअस होते. यापूर्वी २०१० साली मार्चमध्ये किमान तापमान १६.५ अंश होते. मार्च महिन्यात मनालीमध्ये कमाल तापमान २७.५ वर पोहोचले. यापूर्वी २००४ मध्ये तापमान २७ अंश होते. तर धर्मशाला येथे कमाल तापमान ३२.२ अंश नोंदवले गेले. यापूर्वी २०१० मध्ये धर्मशाला येथे ३१.६ अंश सेल्सिअस तापमान होते.

water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
wresters deepak punia sujeet denied entry to asia olympic qualifiers tournament
आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत दीपक, सुजितला प्रवेश नाकारला! दुबईतील पावसामुळे बिश्केकमध्ये पोहोचण्यास उशीर
Nashik heats up temperature at 40.4 degree Celsius but sprinkles of rain in some areas
नाशिक तापले… पारा ४०.४ अंशावर, काही भागात पावसाचा शिडकावा
Mumbai Swelters, Heatwave Grips, mumbai Citizens Advised, Take Precautions, summer in mumbai, heatwave in mumbai, precautions from sunstroke, sunstroke in mumbai,
उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण

Heat Wave चा सामना करण्यासाठी करा ‘या’ थंडगार सरबतांचे सेवन; गरमीच्या दाहकतेवर ठरेल परिणामकारक

संदीप यांनी सांगितले की आजकाल, हिमाचलमध्ये तापमान सामान्यपेक्षा ६ ते ७ अंशांनी जास्त आहे. येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होणार आहे. मात्र, दोन दिवसांपासून काही भागात खराब हवामान असल्याने तापमानात फारशी वाढ होणार नाही. शिमल्यात उष्मा वाढल्याने पाण्याचे संकटही गडद होऊ लागले आहे. शिमल्यात पाण्याचे रेशनिंग सुरू झाले आहे. अशा स्थितीत उन्हाळा असाच कायम राहिल्यास या पर्यटन हंगामात २०१८ सारखे संकट उद्भवू शकते.