एकेकाळी वाहन बाजारात राज्य करणारी अ‍ॅम्बेसेडर कार नव्या अवतारात पुन्हा बाजारात येण्याची शक्यता आहे. यासाठी हिंदुस्तान मोटर्स कंपनी जोमाने तयारीला लागली आहे. हिंदूस्तान मोटर्स कंपनी अ‍ॅम्बेसेडरला इलेक्ट्रिक रुपात बाजारात आणण्याचा विचार करत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार हिंदुस्तान मोटर्स इलेक्ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन करण्यासाठी युरोपियन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीसोबत भागीदारी करण्याची योजना आखत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेन्नई उत्पादन प्लांटमध्ये बनणार नवे मॉडेल

भागीदारीची संपूर्ण प्रक्रिया सुमारे तीन महिन्यांत पूर्ण होईल. कंपनी सुरुवातीला इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे उत्पादन करणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच आगामी प्रकल्पातील सहयोग ५१.४९ गुणोत्तरावर आधारित असेल. अ‍ॅम्बेसेडरचे नवीन मॉडेल हिंदुस्थान मोटर्सच्या चेन्नई उत्पादन प्लांटमध्ये तयार केले जाईल. जे सध्या HMFCI च्या मालकीचे आहे. HMFCI सीके बिर्ला समूहाचा भाग आहे.

शेवटची अ‍ॅम्बेसेडर कधी बनवली होती?

भागीदारीची संपूर्ण प्रक्रिया सुमारे तीन महिन्यांत पूर्ण होईल. कंपनी सुरुवातीला इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे उत्पादन करणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालात असेही म्हटले आहे की हिंदुस्थान मोटर्सचा चेन्नई प्लांट मित्सुबिशी कार बनवत असे, तर उत्तरपारा प्लांट अ‍ॅम्बेसेडर कार बनवत असे. हिंदुस्तान मोटर्सच्या उत्तरपारा प्लांटमधील शेवटची अ‍ॅम्बेसेडर सप्टेंबर २०१४ मध्ये बनवण्यात आली होती. त्यावेळी निर्मात्यावर खूप कर्ज होते आणि विक्री कमी होती, म्हणून ब्रँड ग्रुप PSA ला विकला गेला.

स्वस्त कारमुळे अ‍ॅम्बेसेडरसमोर आव्हान

१९७० च्या दशकात हिंदुस्थान मोटर्सचा भारतीय ऑटोमोबाईल बाजारात ७५% हिस्सा होता. ते आयकॉनिक अ‍ॅम्बेसेडर कारचे उत्पादन करत होते. जेव्हा मारुती ८०० आणि इतर मॉडेल्ससारख्या स्वस्त आणि अधिक परवडणाऱ्या कार देशात येऊ लागल्या, तेव्हा हिंदुस्थान मोटर्स अ‍ॅम्बेसेडरसमोर आव्हान उभे राहिले. २०१७ मध्ये, Groupe PSA ने हिंदुस्तान मोटर्सच्या मालकीच्या बिर्ला ग्रुपकडून Peugeot A आणि Ambassador ब्रँड खरेदी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The iconic car ambassador is make a comeback in a new look dpj
First published on: 27-05-2022 at 12:23 IST