त्रिपुरातील गोमती जिल्ह्य़ातील बीरगंज विधानसभा पोटनिवडणुकीत सत्तारूढ माकपने आपला जवळचा प्रतिस्पर्धी भाजपचा पराभव केला आहे. माकपचे उमेदवार परिमल देवनाथ हे तब्बल १० हजार ५९७ विजयी झाले आहेत.

परिमल देवनाथ यांनी भाजपचे उमेदवार रणजित दास यांचा पराभव केला.  देवनाथ यांना २०,३५५ मते तर रणजित दास यांना ९७५८ मते मिळाली. काँग्रेसच्या चंचल डे यांना केवळ १२३१ इतकी मते मिळविण्यात यश आले.

यापूर्वी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मनोरंजन अचार्जी यांनी या मतदारसंघात विजय मिळविला होता. मात्र त्याच्यावर आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्याचा आरोप असल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे या मतदार संघात पोटनिवडणूक घेण्यात आली. मात्र, तरी माकप या ठिकाणी विजय मिळविण्यात यशस्वी ठरला.