थरकाप उडवणारी घटना : महिला तहसीलदाराला जिवंत जाळलं

जाणून घ्या कुठे घडली घटना? आरोपी अद्यापही फरार

तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या ठिकाणी एका तहसीलदार महिलेस चक्क तिच्या कार्यालयात जाऊन जिवंत जाळल्याचा प्रकार घडला आहे.

तहसीलदारांना भेटायचे आहे, असे सांगून एक व्यक्ती कार्यालयात घुसला होता. यानंतर त्याने तहसीलदार विजया रेड्डी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले व घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत तहसीलदार विजया  गंभीररित्या जळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, विजया यांना पेटवून देण्यात आल्याचे समजताच कार्यालयातील अन्यकाही जणांनी त्यांच्या कक्षाकडे धाव घेतली, त्यातील दोघांनी विजया यांना लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न देखील केला. यात ते दोघेही भाजल्या गेले, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The tahsildar woman was burnt alive msr

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या