शेअर बाजारात गेल्या काही दिवसांत झालेल्या तुफानामुळे गुंतवणूकदारांच्या जवळपास पाच लाख कोटी रुपयांची माती झाली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांनी धसका घेतला असला तरी तज्ज्ञांच्यामते शेअर खरेदीसाठी ही चांगली वेळ आहे. अनेक चांगले चांगले शेअर आपटी खाल्यामुळे स्वस्तात उपलब्ध आहेत आणि आत्ताच खरेदी केले तर काही शेअर तर 62 टक्क्यांपर्यंत फायदा देऊ शकतात. विशेष म्हणजे असे काही शेअर्स आहेत ज्यांची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी म्हणजे 200 रुपयांपेक्षा कमी आहे. जवळपास 13 महिने तेजीत असलेल्या शेअर बाजाराला लागलेला लगाम स्मार्ट गुंतवणूकदारांसाठी पथ्यावर पडणारी गोष्ट असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे. फायनान्शियल एक्सप्रेसने गुंतवणूक तज्ज्ञांच्या दाखल्याने असे काही स्टॉक्स सुचवले आहेत जे 200 रुपयांपेक्षा कमी किमतीला उपलब्ध आहेत आणि तुम्हाला कमी कालावधीत देऊ शकतात भरपूर परतावा…

जैन इरिगेशन – एचडीएफसी सेक्युरिटीज

69 villages in Vasai will get water from Surya project
वसईतील ६९ गावांचा पाणी प्रश्न मिटला; लवकर सुर्या प्रकल्पातील पाणी मिळणार
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल
researchers role in artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे उपयोग

गेल्या एका वर्षात जैन इरिगेशननं 18 टक्क्यांचा परतावा दिला आहे. एचडीएफसी सेक्युरिटीज या रीसर्च व ब्रोकरेज फर्मनं हा शेअर 187 रुपयांपर्यंत म्हणजे तब्बल 62 टक्के वाढ इतकी झेप घेऊ शकतो असा अंदाज वर्तवला आहे.

टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन – एचडीएफसी सेक्युरिटीज

गेल्या एका वर्षामध्ये टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशनचा शेअर तब्बल 150 टक्क्यांनी वधारला आहे. हा शेअर 227 रुपयांची पातळी गाठू शकतो असा अंदाज एचडीएफसी सेक्युरिटीजने वर्तवला आहे. ही वाढ सध्याचा बाजारभाव लक्षात घेता तब्बल 46 टक्क्यांची आहे.

एनएमडीसी – एचडीएफसी सेक्युरिटीज

गेल्या एका वर्षात एनएमडीसीच्या शेअरमध्ये फारसा बदल झाला नाही. जवळपास आहे तिथंच या शेअरचा भाव राहिला. परंतु एचडीएफसी सेक्युरिटीजने या शेअरला आता बाय रेटिंग दिलं असून हा शेअर 22 टक्क्यांनी वधारून 163 रुपयांची पातळी गाठेल असा अंदाज कंपनीनं वर्तवला आहे.

 

इक्विटास होल्डिंग्ज – अॅक्सिस सेक्युरिटीज

गेल्या 12 महिन्यांमध्ये इक्विटास होल्डिंग्जचा भाव 24 टक्क्यांनी पडला आहे. अॅक्सिस सेक्युरिटीज या रीसर्च व ब्रोकरेज कंपनीने मात्र आता हा शेअर सध्याच्या पातळीवरून 32 टक्क्यांनी वधारून 185 रुपयांपर्यंत मजल मारेल असा अंदाज वर्तवला आहे.

एल अँड टी फायनान्स होल्डिंग्ज – अॅक्सिस सेक्युरिटीज

एल अँड टी फायनान्स होल्डिंग्जच्या शेअरचा बाव गेल्या एका वर्षामध्ये 50 टक्क्याने वधारला आहे. हा शेअर सध्याच्या बाजारभावापेक्षा आणखी 33 टक्क्यांनी वधारेल असा अंदाज अॅक्सिस सेक्युरिटीज वर्तवला आहे.

त्यामुळे सध्या शेअर बाजार पडलेला असला तरी ही गुंतवणुकीची संधी असून चांगल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले तर नजीकच्या काळात 62 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे.