Premium

१०० रुपयांची हातोडी, १३०० चं डिश कटर घेतलं अन् दागिन्यांचं शोरूम लुटलं, २५ कोटींच्या चोरीचं गूढ उकललं

चोरीच्या आधी दोन वेळा चोर शोरूममध्ये ग्राहक बनून गेला होता. त्याने शोरूमची नीट पाहणी करून इमारतीचा अभ्यास करून ही चोरी केली.

delhi jangpura showroom robbery
दिल्लीतल्या ज्वेलर्समधील चोरीचं गूढ उकललं. (Express File Photo)

राजधानी दिल्ली सोमवारी (२५ सप्टेंबर) एका मोठ्या चोरीच्या घटनेने हादरली. दिल्लीतल्या जंगपुरा परिसरातील एका ज्वेलर्समध्ये तब्बल २५ कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. शोरूमच्या मालकाने पोलीस तक्रारीत सांगितलं की त्याच्या शोरूममधून तब्बल २० ते २५ कोटी रुपयांच्या सोने आणि हिरेजडीत दागिन्यांची चोरी झाली आहे. उमराव सिंह ज्वेलर्स असं या शोरूमचं नाव असून सोमवारी शोरूम बंद असताना चोरांनी शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला आणि आत ठेवलेले कोट्यवधी रुपयांचे दागिने पळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चोरांनी नेमकी चोरी केली कशी? असा प्रश्न सर्वांना पडला होता. परंतु, आता या चोरीचं गूढ उकललं आहे. पोलीस तपासादरम्यान अनेक गोष्टींची उकल झाली आहे. पोलिसानी या चोरीच्या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. यापैकी एकाचं नाव लोकेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या चोरीसाठी लोकेशने दिल्लीतल्या चांदणी चौक बाजारातून हतोडी आणि इतर साधनसामग्री खरेदी केली होती. तसेच चोरी करण्याआधी अनेकदा दुकानाची रेकी (पाहणी) केली होती. त्यानंतर संपूर्ण योजना आखून त्याने दोन साथीदारांसह तब्बल २५ कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thief brought screwdriver 100 rs hammer 1300 rs disc cutter delhi jangpura showroom robbery asc

First published on: 01-10-2023 at 15:22 IST
Next Story
नरेंद्र मोदींनी ‘७५ हार्ड डे’ चॅलेंज फेम अंकितची घेतली भेट; इन्फ्लूएंसरने पंतप्रधानांना सांगितला फिटनेस प्लॅन