सध्या भारतातील सर्वच राज्यात प्रचंड उकाडा जाणवत आहे. उत्तर भारतात तर पारा नेहमीपेक्षा अधिक वर गेलेला दिसत आहे. रात्रीही उकाडा असह्य झाल्यामुळे अनेकांची झोप पुरी होत नाहीये. चोरांनाही अपुऱ्या झोपेचा त्रास जाणवत असावा. याचे कारण म्हणजे उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये एका चोराला विचित्र परिस्थितीत अटक करण्यात आली आहे. एका बंद खोलीत चोरीच्या उद्देशाने शिरलेला हा चोर एसी चालू करून फसला आणि अलगदपणे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. नेमके प्रकरण काय घडले? ते पाहू.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, शनिवारी रात्री गाझीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लखनौच्या इंदिरा नगर, सेक्टर २० मध्ये हा प्रकार घडला. डॉ. सुनील पांडे यांच्या मोकळ्या घरात चोराने प्रवेश केला. पांडे सध्या वाराणसी येथील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असल्यामुळे लखनौमधील त्यांचे घर मोकळे होते.

Ambani wedding, ambani son wedding,
अंबानींच्या लग्नात बॉम्ब ठेवल्याच्या सोशल मीडियावरील पोस्टने यंत्रणा सतर्क
Mihir Shah clean shave
अपघातानंतर मिहीर शाहकडून ओळख लपवण्याचा प्रयत्न? पोलिसांना चकवा देण्याकरता शक्कल!
What to do if water enters the petrol tank of a bike
पावसाळ्याच्या दिवसात बाईकच्या पेट्रोलच्या टाकीत पाणी शिरल्यास काय कराल? ‘या’ ट्रिक्स येतील कामी
Maruti Suzuki Jimny discounts
विक्री होईना आता मारुतीच्या ‘या’ SUV कारवर २.५ लाखापर्यंत डिस्काउंट; पाहा भन्नाट ऑफर, होईल तुमच्या पैशांची बचत
Loksatta samorchya bakavarun Narendra Modi rule will remain in Parliament
समोरच्या बाकावरून: तरीही संसदेत राहणार मोदींचीच हुकूमत?
What do you do to prevent corrosion of a car Follow these tips
कारच्या गंज प्रतिबंधात्मक संरक्षणासाठी काय कराल? फॉलो करा ‘या’ टिप्स
pune man petrol on traffic police marathi news
धक्कादायक! दुचाकी अडवल्याचा राग आल्याने वाहतूक पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
lpg cylinder caught fire in mauli palkhi ceremony
माउलींच्या पालखी सोहळ्यात सिलेंडरने घेतला पेट;अग्निशमन दलाच्या जवानांकडून वेळीच आग आटोक्यात

माध्यम सम्राट, अब्जाधीश रुपर्ट मरडॉक यांनी ९३ वर्षी केलं पाचवं लग्न

मोकळे घर पाहून चोराने कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील मौल्यवान वस्तू गोळा केल्यानंतर चोराने एसी सुरू केला आणि थोडा वेळ तिथेच पडला. मात्र त्याला थंड हवेमुळे गाढ झोप लागली. दरम्यान पांडे यांच्या दाराचे कुलूप तोडल्याचे शेजाऱ्यांनी सकाळी पाहिले. तसेच घरात डोकावून पाहिले असता आतील वस्तू अस्ताव्यस्त केलेल्या दिसत होत्या. यानंतर शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कपिल नावाच्या चोराला झोपेतच पकडले. चोरलेल्या वस्तू आजूबाजूला ठेवून चोर शांतपणे झोपला होता. पोलिसांनी त्याच्यावर कलम ३७९ अ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले की, चोराने घरातील कपाट फोडले होते. कपाटातील मौल्यवान वस्तूंहस त्याने रोख रक्कमही चोरली होती. तसेच वॉशबेसिन, गॅस सिलिंडर आणि पाण्याचा पंप चोरण्याचाही प्रयत्न त्याने केला. मात्र त्याआधीच त्याला झोप लागली.

पोलिसांनी पुढे सांगितले की, चोराला गाढ झोप लागली होती. त्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला तरी तो उठत नव्हता. रात्री मद्यपान केल्यामुळे त्याला झोप लागली होती, असेही पोलिसांनी सांगितले. पांडे यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, डॉ. पांडे यांचे वडील या घरात राहत होते. मात्र त्यांच्या निधनानंतर हे घर बंद आहे. डॉ. पांडे आपल्या कुटुंबासह वाराणसी येथे राहतात, ते अधूनमधून या घरी येत असतात.”