भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हिंदू धर्माला असलेल्या कोणत्याही कथित धोक्यांशी संबंधित सर्व दावे फेटाळून लावले आहेत, अशा आशंका केवळ ‘काल्पनिक’ असल्याचे नमूद केले आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील गृहमंत्रालयाने (एमएचए) स्पष्टपणे म्हटले आहे की, हिंदू धर्माला तथाकथित ‘धमक्या’ देण्याबाबत त्याच्याकडे कोणतेही रेकॉर्ड किंवा पुरावे नाहीत, असे नागपुरातील कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांना दिलेल्या आरटीआयच्या उत्तरात म्हटले आहे.

३१ ऑगस्ट रोजी एका आरटीआय चौकशीमध्ये जबलपुरे यांनी “देशातील ‘हिंदू धर्माला धोका असल्याचे पुरावे मागितले होते, जे गृहमंत्रालयाच्या ताब्यात होते. त्यानंतर साधारण एका महिन्याने गृहमंत्रालयाचे अधिकारी व्ही. एस. राणा यांनी दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे की, त्यांना हिंदू धर्माला असलेल्या धोक्याबद्दल काही कल्पना नाही. तसे पुरावेही कुठे आढळले नाहीत. ते हेही म्हणाले की, जी माहिती त्यांच्या अखत्यारित आहे, जी देण्याचा त्यांना अधिकार आहे, त्या माहितीमध्ये तरी अशी कोणती शक्यता व्यक्त होत नाही. यासंदर्भात केंद्राकडे कोणतीही नोंद नसल्याने, राणा यांनी असा दावा केला की जबलपुरे यांच्या प्रश्नाला उत्तर देणे शक्य नाही.

“पहिल्यांदाच गृहमंत्रालयाच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने म्हटले आहे की ‘हिंदू धर्माला धमक्या’ यासंबंधी कोणतीही चौकशी काल्पनिक आहे आणि रेकॉर्डवर कबूल केले आहे की त्यांच्याकडे अशा कोणत्याही शक्यतांचे समर्थन करण्यासाठी कोणतेही रेकॉर्ड नाहीत”, असे जबलपुरे म्हणाले.
असे असूनही, त्यांनी आरोप केला की, भाजप आणि त्याचे सहयोगी, राजकीय फायद्यांसाठी, हिंदूंमध्ये एक भीती निर्माण करत आहेत की त्यांचा धर्म आणि धार्मिक ओळख गंभीर धोक्यात आहे.”नमस्ते सदा वत्सले मातृभुमे” ही संस्कृतमध्ये आरएसएसची प्रमुख प्रार्थना, हिंदू धर्म आणि भारतमाता वाचवण्याचा संदर्भ देते, ज्याचा देशभरातील सर्व कार्यकर्ते दररोज दोनदा जप करतात, “जबलपुरे म्हणाले.