पंजाबमधील कर्तारपूर साहिब येथे ट्रेनच्या धडकेत तीन मुलं ठार झाली असून, एक जखमी झाला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक जगजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलं ट्रॅकवर बसून बोरं खात होती. यावेळी समोरुन ट्रेन येत असल्याची त्यांना कोणताही कल्पना नव्हती. धडकेनंतर दोन मुलं जागीच ठार झाले, तर एका मुलाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. एक मुलगा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सतलज नदीवर असणाऱ्या लोहंद पुलावर ही दुर्घटना घडली. मुलं ट्रॅकवर बसलेली होती तेव्हा ट्रेन कर्तारपूर साहिबजवळ पोहोचली होती. ही ट्रेन सहारनपूर येथून हिमालच प्रदेशला निघाली होती.

दुर्घटनेनंतर ट्रेन थांबली होती. यानंतर जखमी मुलांना आनंदपूर साहिब येथील सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी एका मुलाने रस्त्यातच प्राण सोडला.

घटनेची दखल घेत पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शोक व्यक्त केला असून सरकारला मुलांच्या नातेवाईकांना योग्य ती मदत देण्याचं आवाहन केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three children dies after train hits in punjab kiratpur sahib sgy
First published on: 28-11-2022 at 08:09 IST