Howrah Fire Three Children Killed : हावडा जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी फटाके फोडताना आग लागल्याने तीन मुलांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना उलुबेरियाच्या बाजारपारा भागात घडली. तानिया मिस्त्री (१४), इशान धारा (६) आणि मुमताज खातून (८) अशी पोलिसांनी पीडितांची नावे आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, उलुबेरिया नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २७ मध्ये लहान मुलांसह काही स्थानिक रहिवासी फटाके फोडत होते. फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे जवळच ठेवलेले आणखी फटाके पेटले, ज्यामुळे शेजारच्या घरात सिलिंडरचा स्फोट झाला आणि कुटुंबातील सदस्य अडकले. या घरात तीन लहान मुलं होती. आग लागल्यानंतर ते आगीत होरपळले. तिघांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Kanpur Fire
Kanpur Fire : धक्कादायक! दिव्यामुळे घराला लागली आग; उद्योगपती पती-पत्नीसह मोलकरणीचा दुर्दैवी मृत्यू
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
rahul gandhi 10 janpath house
“माझ्या वडिलांचं इथेच निधन झालं, त्यामुळे या घराचा…”, राहुल गांधींनी १०, जनपथबाबत केलं विधान!
lawrence bishnoi brother anmol bishnoi
लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा ठावठिकाणा लागला! अमेरिकेनं भारताला दिली माहिती, प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
gross state income maharashtra
महाराष्ट्राची दशकभरात पीछेहाट, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष; सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हेही वाचा >> Mumbai Fire News: अंधेरी येथे भंगाराच्या गोदामाला भीषण आग; मुंबईत घडल्या चार आगीच्या घटना

u

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत आणखी दोन मुले गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर उलुबेरिया मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हे घर काजल शेख यांचे होते आणि तीन मुलांपैकी एक त्यांच्या कुटुंबातील होते तर इतर शेजारी होते.

प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी

अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री आणि बंगाल भाजपाचे प्रमुख सुकांता मजुमदार यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

ते म्हणाले, “दिवाळीच्या सणामध्ये ही घटना हृदयद्रावक आहे. या परिस्थितीत मी त्यांच्या शोकाकुल पालक आणि कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे. प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की त्यांनी कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहावे. त्याचवेळी मी प्रशासनाकडे संपूर्ण चौकशीची मागणी करतो. या घटनेनंतर शहरात शोककळा पसरली आहे.

मुंबईतही आगीची घटना

दरम्यान, गोरेगाव येथील हब मॉलजवळील लोढा फियोरेन्जा इमारतीला आगल लागल्याची घटना घडली. सायंकाळी ७.३५ दरम्यान आग लागल्याची माहिती मिळली. इमारतीच्या ३० व्या मजल्यावर स्तर -१ ची आग लागली होती. अग्निशमन दलासह मुंबई पोलीस आणि अदाणी पॉवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. याही घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.

Story img Loader