खांडवा : धार्मिक नेत्या साध्वी ऋतंभरा चालवत असलेल्या एका निवासी आश्रमशाळेतील ३ मुली मध्यप्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात एका कालव्यात बुडून मरण पावल्या. ही घटना मांधाता (ओंकारेश्वर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोठी खेडय़ात बुधवारी सकाळी घडली.

मृत्युमुखी पडलेल्या मुली १०-११ वर्षे वयोगटातील आणि पाचवीच्या विद्यार्थिनी होत्या व त्या साध्वी ऋतंभरा चालवत असलेल्या एका निवासी आश्रमशाळेत राहात होत्या, असे पोलिसांनी सांगितले. या मुली आंघोळीसाठी कालव्यावर गेल्या असताना त्यांच्यापैकी एक मुलगी बुडू लागली. इतर मुलींनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याही बुडाल्या, अशी माहिती ठाणेदार बलराम सिंह यांनी दिली. वैशाली, प्रतिज्ञा, दिव्यांशी व अंजना या मृत मुली खरगोन जिल्ह्याच्या रहिवासी होत्या, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून ते शवचिकित्सेसाठी पाठवले.मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुलींच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.