scorecardresearch

गोठलेल्या तलावावर चालण्याचा मोह जिवावर बेतला; अमेरिकेत तीन भारतीयांचा विचित्र दुर्घटनेत मृत्यू

मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली

गोठलेल्या तलावावर चालण्याचा मोह जिवावर बेतला; अमेरिकेत तीन भारतीयांचा विचित्र दुर्घटनेत मृत्यू
पोलिसांनी या वृत्ताला दिला दुजोरा (फाइल फोटो, सौजन्य – रॉयटर्स)

अमेरिकेतील अ‍ॅरेझोना राज्यामध्ये घडलेल्या एका दुर्देवी घटनेत तीन भारतीय-अमेरिकी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एका गोठलेल्या तळ्यावरुन चालताना या तळ्यावरील पृष्ठभागावरच्या बर्फाला तडा गेल्याने सर्वजण तलावात पडून मृत्यूमुखी पडले. मरण पावलेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

सदर घटना ही २६ डिसेंबर रोजी कोकोनिऑन काऊंट भागातील वूड्स कॅनयॉन लेक येथे घडली. दुपारी तीन वाजून ३५ मिनिटांनी हा अपघात घडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. “मृतांची ओळख पटली आहे. नारायण मुदण्णा (४९), गोकूळ मेदीशेटी (४७) आणि हरिथा मुदण्णा अशी मरण पावलेल्या व्यक्तींची नावं आहेत. हे तिघेही चॅण्डलेर येथे वास्तव्यास होते आणि मूळचे भारतीय आहेत,” अशी माहिती मंगळवारी कोकोनिऑन कंट्री शेरीफ ऑफिसमार्फत जारी करण्यात आलेल्या पत्रकात दिली आहे. फिनॉक्स शहराचं उपनगर अशी चॅण्डलेरची ओळख आहे.

नक्की वाचा >> ‘ट्रम्प वॉल’ ओलांडण्याच्या नादात गुजराती व्यक्तीचा मृत्यू! घुसखोरीच्या प्रयत्नात मृत व्यक्तीची पत्नी भिंतीवरुन अमेरिकन प्रांतात पडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिरथा यांना तातडीने पाण्याबाहेर काढून जीव वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो अयशस्वी ठरला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी नारायण आणि गोकूळ यांचा शोध सुरु केला. या दोघांचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं. तिघांचेही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलेत.

नक्की वाचा >> वाहन चालक ते ३३ कोटींचा मालक… बॉसशी गप्पा मारता मारता बदललं दुबईमधील ३१ वर्षीय भारतीय तरुणाचं नशीब

अपघात झालं ते वूड्स कॅनयॉन तलाव हे आल्प-सिटग्रावस राष्ट्रीय उद्यानामध्ये पायसन क्षेत्रामध्ये आहे. हॅकर्स आणि साहसी खेळ आवडणाऱ्यांसाठी हे तलाव एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 12:10 IST

संबंधित बातम्या