अमेरिकेतील पुरात भारतीय वंशाच्या तिघांचा मृत्यू

२००५ मधील कॅटरिना वादळानंतरचे इडा हे हे सर्वात भीषण वादळ असून त्यामुळे पन्नासवर बळी गेले आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूजर्सी राज्यात  आलेल्या पुरात भारतीय वंशाचे दोन जण वाहून गेले आहेत. इडा वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसाने तेथे पूर आला होता.२००५ मधील कॅटरिना वादळानंतरचे इडा हे हे सर्वात भीषण वादळ असून त्यामुळे पन्नासवर बळी गेले आहेत.  अमेरिकेत आतापर्यंत वादळाने ६५ बळी घेतले असून त्यातील सर्वाधिक बळी न्यूजर्सी, न्यूयॉर्क, लुईझियाना येथे गेले होते. भारतीय वंशाच्या मालती कांचे (वय ४६) या सॉफ्टवेअर अभियंता पंधरा वर्षांच्या मुलीबरोबर मोटारीने घरी जात असताना बुधवारी त्यांचे वाहन पुराच्या पाण्यात अडकले. न्यूजर्सीतील ब्रिजवॉटर येथे २२ क्रमांकाच्या मार्गावर ही घटना घडली. कांचे व त्यांची कन्या पुराच्या पाण्यामुळे झाडावर चढून  बसले असे त्यांच्या कौटुंबिक मित्र मानसी मागो यांनी सांगितले पण ते झाडच कोसळले व  दोघी पुरात वाहत गेल्या.  शुक्रवारी त्यांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली. धनुष रेड्डी (वय ३१) हे साऊथ प्लेनफील्ड येथे तोल जाऊन ३६ इंचाच्या सांडपाणी पाईपात कोसळले. रेड्डी यांचा मृतदेह नंतर काही मैलांवर आढळला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Three indian origin persons killed in us floods zws

ताज्या बातम्या