श्रीनगरमधील चकमकीत तीन दहशतवादी ठार

दक्षिण काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यातील  चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा  दहशतवादी मारला गेला आहे.

श्रीनगर : काश्मीरमध्ये गेल्या २४ तासात झालेल्या दोन चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले आहेत.प्रतिबंधित असलेल्या मुजाहिद्दीन गझवातुल हिंद या संघटनेचा दहशतवादी मारला  गेला असून त्याच्यावर श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची कामगिरी सोपवण्यात आली होती. तो श्रीनगरमध्ये मारला गेला, दक्षिण काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यातील  चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा  दहशतवादी मारला गेला आहे. श्रीनगरमध्ये मारला गेलेला दहशतवादी हा २०१९ मध्ये पुलवामातील लेथपोरा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ४० जवानांवर करण्यात आलेल्या हल्ल्यातील दहशतवाद्याचा नातेवाईक आहे. काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी ट्विटरवर म्हटले आहे,की श्रीनगर येथे आमीर रियाझ हा खरू येथील दहशतवादी मारला गेला असून तो पुलवामा हल्ल्याशी संबंधित एका दहशतवाद्याचा नातेवाईक आहे. त्याच्यावर श्रीनगरमध्ये आत्मघाती हल्ला करण्याची कामगिरी सोपवण्यात आली होती. गुरूवारी सायंकाळी श्रीनगरमधील हमिदानिया वसाहतीत ही चकमक झाली. हे ठिकाण बेमिना भागात आहे. या दहशतवाद्याकडे एके रायफल व दारूगोळा सापडला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Three militants killed in srinagar clash akp

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या