एका पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिघा अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची घटना येथील मदार छल्ला विभागात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. दूध आणण्यासाठी सदर अल्पवयीन मुलगी दुकानात गेली असताना दोन दिवसांपूर्वी तिच्यावर तिघा अल्पवयीन मुलांनी बलात्कार केला. या मुलांनी तिला रिक्षात कोंबले आणि जवळच्या निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
खूप वेळ होऊनही मुलगी घरी न परतल्याने तिच्या आईने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती एका गाडीत वेदनांनी विव्हळताना आढळली. त्या अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. आपण तेथून पळण्याचा प्रयत्न केला तेव्हा तीन मुलांनी आपल्याला मारहाण केली, असेही तिने आईला सांगितले. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले.