इस्रायली सैन्याच्या गोळीबारात तीन पॅलेस्टिनी नागरिक ठार

गोळीबारात अल नबुल्सी आणि आणखी एक पॅलेस्टाईनचा दहशतवादी ठार झाला. या घरात मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रे व दारूगोळा सापडला.

इस्रायली सैन्याच्या गोळीबारात तीन पॅलेस्टिनी नागरिक ठार
(संग्रहित छायाचित्र)

एपी, जेरूसलेम :नाब्लस या वेस्ट बँक येथील शहरात इस्राइलने राबवलेल्या अटक मोहिमेदरम्यान इस्रायली सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पॅलेस्टाईनचे तीन नागरिक ठार झाले व सुमारे ४० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयातर्फे ही माहिती देण्यात आली.

गाझापट्टीत पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद दहशतवादी गट आणि इस्राइलदरम्यान तीन दिवस झालेल्या संघर्षांनंतर येथे झालेल्या युद्धबंदीनंतर ही गोळीबाराची घटना घडली आहे. वेस्ट बँक येथे या वर्षांरंभी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत इस्रायलला हवा असलेल्या इब्राहिम अल नबुल्सी याच्या घराला सुरक्षा दलांनी वेढा घातला होता. यावेळी झालेल्या गोळीबारात अल नबुल्सी आणि आणखी एक पॅलेस्टाईनचा दहशतवादी ठार झाला. या घरात मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रे व दारूगोळा सापडला.

पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले, की तीन पॅलेस्टाईनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात अल नबुल्सी, इस्लाम सबुह व हुसैन जमाल तहा आणि किमान चाळीस पॅलेस्टाईनचे नागरिक जखमी झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विरोधकांचे अस्तित्व संपवू पाहणाऱ्या सरकारला विरोध ; मेहबूबा मुफ्ती यांची भूमिका
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी