पश्चिम बंगाल : STF ने घातपाताचा कट उधळला ; तीन संशयित दहशतवादी पकडले!

जमात-उल-मुजाहिदीन बांग्लादेशचे सदस्य असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

Three suspected terrorists arrested
दक्षिण कोलकातामधील हरिदेवपूर भागातून तिघांना अटक करण्यात आली आहे. (संग्रहीत छायाचित्र)

कोलकाता पोलिसांच्या विशषे कृती दलाने (एसटीएफ) आज(रविवार) तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करत, घातापाताचा मोठा कट उधळला. हे तिन्ही दहशतवादी जमात-उल-मुजाहिदीन बांग्लादेशचे सदस्य असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

या तिघांनाही एसटीएफने आज दुपारी दक्षिण कोलकातामधील हरिदेवपूर भागातून अटक केली. पोलिसांनी सांगितले की, कोलकाता पोलिसांच्या विशषे कृती दलाने (एसटीएफ) या तिघांना पकडले. जेएमबी या संघटनेचे हे तिन्ही संशयित दहशतवादी काही महिन्यांपासून भाडेतत्वार खोली करून राहत होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर या तिघांना अटक करण्यात आली.

तर, ”आम्हाला जिहादी साहित्य सापडले आहे आणि त्यांच्या फेसबुक खात्यांची तपासणी केली गेली आहे. याशिवाय महत्त्वाच्या जेएमबी सदस्यांची नावे आणि फोन नंबर्स असलेली हस्तलिखित डायरी आढळली. चौकशी सुरू केली आहे. आम्ही हे उद्या कोर्टासमोर मांडू.” असे कोलकाता पोलीस एसटीएफचे अतिरिक्त आयुक्त व्ही. सोलोमन नेसाकुमार यांनी सांगितले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Three suspected jamaat ul mujahideen bangladesh jmb terrorists arrested by kolkata polices special task force msr

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या