पुलवामाच्या पहू भागात आज(रविवार) झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. कारवाईत ठार झालेले दहशतवादी ‘लष्कर-ए-तोयबा’ या संघटनेचे होते. अद्यापही या भागात चकमक सुरू आहे.

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पहू भागात दहशतवादी असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार शोधमोहीम सुरू झाली होती. या दरम्यान दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला, यानंतर चकमकीला सुरुवात झाली.

या भागात आणखी दहशतवादी दडून बसले असण्याची शक्यता असल्याने, जवानांनी परिसरास चारही बाजूंनी वेढा दिला असून, शोधमोहीम सुरू आहे.