Premium

मध्य प्रदेशात तीन केंद्रीय मंत्री भाजपचे उमेदवार

भाजपने सोमवारी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ३९ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल आणि फग्गन सिंह कुलस्ते या तीन केंद्रीय मंत्र्यांसह चार खासदारांचा समावेश आहे.

BJP 4
(भाजप)

पीटीआय, नवी दिल्ली : भाजपने सोमवारी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ३९ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल आणि फग्गन सिंह कुलस्ते या तीन केंद्रीय मंत्र्यांसह चार खासदारांचा समावेश आहे. उमेदवारी जाहीर झालेल्या खासदारांत भाजपचे लोकसभेतील मुख्य प्रतोद राकेश सिंह, सिधी मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणाऱ्या रिती पाठक, सतनाचे गणेश सिंह आणि नर्मदापुरमचे उदयप्रताप सिंह यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांना इंदूर-१ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने आतापर्यंत राज्यातील ७८ उमेदवारांची घोषणा केली. मध्य प्रदेशात काँग्रेसचे आव्हान लक्षात घेता पक्षाने केंद्रीय मंत्री, खासदारांना विधानसभेची उमेदवारी देत राज्यात सत्ता राखण्याचे प्रयत्न चालविले आहेत. यापैकी अनेक जण लोकसभेवर अनेक वेळा निवडून आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three union ministerial candidates of bjp in madhya pradesh ysh

First published on: 26-09-2023 at 00:15 IST
Next Story
काँग्रेसवर शहरी नक्षल्यांचा ताबा!; पंतप्रधानांची घणाघाती टीका; मध्य प्रदेश, राजस्थानात प्रचाराला धार