तिबेटी युवकांच्या आत्मदहनामागे दलाई लामा यांची चिथावणी

चिनी वृत्तपत्रातील लेखात आरोप गेल्या आठवडय़ात दोन तिबेटी युवकांनी आत्मदहन केले असून त्यातील एक जण भारतातील आहे व या दोघांनी तिबेटमधील चिनी राजवटीचा निषेध करण्यासाठी हे कृत्य केले. त्यामागे दलाई लामा व त्यांच्या अनुसारकांची चिथावणी कारणीभूत आहे, असा आरोप चीनच्या सरकारी वृत्तपत्राने केला आहे. ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे, की दलाई लामा यांनी चिथावणी दिल्याने गेल्या […]

चिनी वृत्तपत्रातील लेखात आरोप

गेल्या आठवडय़ात दोन तिबेटी युवकांनी आत्मदहन केले असून त्यातील एक जण भारतातील आहे व या दोघांनी तिबेटमधील चिनी राजवटीचा निषेध करण्यासाठी हे कृत्य केले. त्यामागे दलाई लामा व त्यांच्या अनुसारकांची चिथावणी कारणीभूत आहे, असा आरोप चीनच्या सरकारी वृत्तपत्राने केला आहे.

ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे, की दलाई लामा यांनी चिथावणी दिल्याने गेल्या काही वर्षांत किमान १०० जणांनी आत्मदहन केले आहे; त्यात तरूण तिबेटी धर्मगुरूंचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्यासाठी ते अशी कृत्ये करतात असा चीनचा आरोप आहे. ते अशी कृत्ये करीत असले तरी बहुसंख्य तिबेटी लोकांना चिनी राजवटीतून बाहेर पडण्याची इच्छा नाही. तिबेटी विद्यार्थी दोरजी सेरिंग (वय १६) याने गेल्या आठवडय़ात आत्मदहन केले, त्यात तो मरण पावला. सिचुआन प्रांतात कलसांग वांगडू (वय १८) या विद्यार्थ्यांने आत्मदहन केले तोही मरण पावला. दोन्ही प्रकरणात पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी पराचा कावळा केला असे वृत्तपत्रातील लेखात म्हटले आहे. परदेशी तिबेटी गटांच्या मते १३० तिबेटी लोकांनी आत्मदहन केले. दलाई लामांच्या चिथावणीमुळे हे प्रकार होत आहेत. १४ मार्च २००८ रोजी ल्हासा येथे दलाई लामा यांनी दंगल घडवली व त्यात १८ निरपराध लोक मारले गेले, असेही ग्लोबल टाइम्स या सरकारी चिनी वृत्तपत्राने म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tibetan youth issue

ताज्या बातम्या