जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये तालिबानी नेता; TIME Magazine ची यादी चर्चेत

TIME मॅगझीनची जगातील १०० सर्वात प्रभावशाली लोकांची यादी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कारणंही तसंच आहे.

time-magazine-2021-taliban-leader-among-100-most-influential-people-in-the-world-gst
तालिबानी नेता मुल्ला बरदारचा TIME मॅगझिन २०२१ च्या जगातील १०० सर्वात प्रभावशाली लोकांमध्ये समावेश (Photo : File)

TIME मॅगझिन २०२१ ने जगातील १०० सर्वात प्रभावशाली लोकांची यादी प्रसिद्ध केली आहे. परंतु, या यादीत असं एक नाव आहे ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. नवीन तालिबान सरकारमधील उपपंतप्रधान आणि दोहा चर्चेचा प्रमुख नेता मुल्ला अब्दुल गनी बरदार याचा टाइम मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली लोकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. शांतता करारादरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेसाठी मुल्ला बरदार यांनी तालिबानचं नेतृत्व केलं होतं.

फेब्रुवारी २०२० मध्ये अफगाण सलोख्यासाठी अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी झल्मय खलीलजाद यांनी दोहामध्ये शांतता करारावर अधिकृतपणे स्वाक्षरी केली तेव्हा बरादार हा तालिबानचा प्रमुख चेहरा होता. टाइम मासिकाने बरादारची ओळख शांत, गूढ व्यक्ती म्हणून केली आहे. त्यात असं म्हटलं आहे की, मुल्ला बरदारने माजी राजवटीतील सदस्यांना क्षमा करणं, तालिबान काबुलमध्ये प्रवेश करताना रक्तपात रोखणं आणि शेजारील देश चीन आणि पाकिस्तानशी संपर्क आणि भेटी करणं यासह अनेक प्रमुख निर्णय घेतले. बरदार हा जो क्वचितच सार्वजनिक निवेदन किंवा मुलाखती देतो.देश-विदेश

अफगाणिस्तानच्या ‘भविष्याचा आधार’ असं वर्णन

बरदारला २०१० मध्ये पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी अटक केली होती आणि २०१८ ला सोडलं होतं. त्यावेळी, अमेरिकेच्या अफगाणिस्तान सोडण्याच्या प्रयत्नांना गती आली होती. मात्र, तालिबानचा सह-संस्थापक असून आणि अमेरिकेसोबतच्या वाटाघाटींमध्ये सर्वोच्च भूमिका बजावलेली असूनही बरादारला काळजीवाहू सरकारमध्ये तुलनेने कमी स्थान देण्यात आलं असं म्हटलं जातं. पाकिस्तानी पत्रकार अहमद रशीद यांनी टाइम मॅगझिनमध्ये मुल्ला बरदार यांचं वर्णन अफगाणिस्तानच्या ‘भविष्याचा आधार’ असं केलं आहे.

नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, आदर पूनावाला यांचाही समावेश

टाईम मासिकाने जाहीर केलेल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे आदर पूनावाला यांचा देखील समावेश आहे. याशिवाय चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, प्रिन्स हॅरी आणि मेगन, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा या जागतिक यादीत समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Time magazine 2021 taliban leader among 100 most influential people in the world gst