17 डिसेंबर 2012 : सहा आरोपींपैकी बसचालक राम सिंह आणि अन्य दोन जणांना अटक करण्यात आली. 18 डिसेंबर 2012 : या दिवशी या प्रकरणातील चौथ्या आरोपीलाही अटक करण्यात आली. 19 डिसेंबर 2012 : दोन आरोपींना दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यापैकी एक आरोपी विनय याने आपल्याला फाशी देण्यासाठी न्यायालयाकडे विनंती केली. 21 डिसेंबर 2012 : अल्पवयीन आरोपीला पूर्व दिल्लीतील आनंदविहार परिसरातून तर सहावा आरोपी अक्षय कुमार सिंह याला बिहारमधून अटक करण्यात आली. 22 डिसेंबर 2012 : पीडिता निर्भयाचा दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवण्यात आला. 23 डिसेंबर 2012 : निर्भया प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयाने फास्ट ट्रॅक न्यायालयाची स्थापना करण्यात आली. 27 डिसेंबर 2012 : पीडिता निर्भयाला पुढील उपचारांसाठी सिंगापूरला नेण्यात आले. 29 डिसेंबर 2012 : गंभीर जखमी झालेल्या निर्भयानं सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात अखेराचा श्वास घेतला. 30 डिसेंबर 2012 : दिल्लीत निर्भयावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 03 जानेवारी 2013 : पोलिसांकडून सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी निर्भयाच्या आईवडिलांनी सर्व आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. 17 जानेवारी 2013 : पाचही आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयाने आरोप निश्चित केले. 23 जानेवारी 2013 : या प्रकरणातील एक आरोपी बाल न्यायालयाने अल्पवयीन ठरवला. 02 फेब्रुवारी 2013 : पाचही आरोपींवर निर्भयाच्या हत्येचे आणि इतर आरोप निश्चित करण्यात आले. 03 फेब्रुवारी 2013 : 19 मार्च रोजी लोकसभेत तर 21 मार्च रोजी राज्यसभेत कठोर कायद्यासाठी प्रासंगिक विधेयक मंजूर करण्यात आले. 05 फेब्रुवारी 2013: या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू करण्यात आली आणि सर्व आरोपींचे जबाब नोंदवून घेण्यात आले. 11 मार्च 2013: सहा आरोपींपैकी राम सिंह या आरोपीने तिहार तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली. 14 जून: 2013 : वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. 11 जुलै 2013: अल्पवयीन आरोपीसंदर्भातील निकालाची तारीख निश्चित करण्यात आली. 31 ऑगस्ट 2013: अल्पवयीन आरोपीला तीन वर्षे सुधारगृहात ठेवण्याचा निकाल न्यायालयाने दिला. 10 सप्टेंबर 2013 : मुकेश, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंह या चारही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले. 13 सप्टेंबर 2013 : दिल्लीच्या साकेत न्यायालयाने या प्रकरणातील चारही दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली. 13 मार्च 2014 : आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. 03 एप्रिल 2016 : 19 महिन्यांनतर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली. आणखी वाचा- निर्भया प्रकरण: शेवटची इच्छा काय?; तुरुंग प्रशासनाच्या प्रश्नावर आरोपी म्हणाले… 11 जुलै 2016 : गुन्हेगांरांनी सर्वोच्च न्यायलयात फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं. 05 मे 2017 : या प्रकरणी चारही आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. 18 डिसेंबर 2019 : निर्भया बलात्कार प्रकरणातील एका आरोपीची याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली. 7 जानेवारी 2020 : निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. 17 जानेवारी 2020 : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुकेशची दया याचिका फेटाळली. 25 जानेवारी 2020 : मुकेशने याविरोधात पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 5 फेब्रुवारी 2020 : न्यायालयाने सर्व आरोपींना फाशी एकत्र फाशी देण्याचा निर्णय दिला. 14 फेब्रुवारी 2020 : विनय या आरोपीनं दया याचिका फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायलयानं ती फेटाळून लावली. आणखी वाचा- याकूब मेमनच्या केसनंतर पाच वर्षांनी निर्भया प्रकरणात रात्री उघडले सुप्रीम कोर्टाचे दरवाजे 5 मार्च 2020 : न्यायालयाने आरोपींच्या फाशीसाठी 20 मार्च ही तारीख निश्चित केली. 16 मार्च 2020 : तीन आरोपींनी याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. 20 मार्च 2020 : सकाळी 5.30 वाजता या प्रकरणातील सर्व दोषींना फाशी देण्यात आली.