scorecardresearch

सत्ता जाण्याच्या मार्गावर असतानाच इम्रान खान यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने काढली त्यांची अक्कल; ट्वीट करत म्हणाली,”सगळं आहे पण…”

रेहम खान यांनी २०१४ मध्ये इम्रान खान यांच्याशी लग्न केले होते आणि एका वर्षानंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले.

Minister Rajeev Chandrasekhar reply Pakistan pm imran khan Pakistan better than india
(Reuters Photo)

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची सत्ता आता कधीही जाणार अशी चिन्हं दिसू लागली आहेत. विरोधी पक्षांनी त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे. बहुमतही विरोधकांच्याच बाजूने आहे. त्यामुळे त्यांची सत्ता कधीही जाणार, असं चित्र आहे. अशातच त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी रेहम खान यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे.

इम्रान खान यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं की, माझ्याकडे प्रसिद्धी, संपत्ती सर्वकाही आहे, मला आता कशाचीही गरज नाही. त्यावर रेहम खान ट्वीट करत म्हणाल्या की तुमच्याकडे सगळं काही आहे फक्त अक्कल नाही. रेहम खान यांनी मात्र इम्रान खान यांच्या एका मुद्द्याशी सहमती दर्शवली कारण ते म्हणाले होते की त्यांनी लहानपणीच पाकिस्तानला सर्वोच्च स्थान मिळवून दिले आहे. “होय, तुम्ही पंतप्रधान नसताना पाकिस्तान महान होता,” असे ट्विट करत रेहम खान यांनी त्यांच्या भाषणावर जोरदार टीका केली. इम्रान खान यांनी आपल्या भाषणात अविश्वास प्रस्तावापूर्वी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले.

विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावामागील प्रेरक शक्ती असल्याचा आरोप करत इम्रान खान यांनी अमेरिकेचे नाव देखील घेतले, जे अमेरिकेने स्पष्टपणे नाकारले. “अमेरिकेकडे आहे — अरे, अमेरिका नाही पण एक परदेशी देश आहे ज्याचे नाव मी सांगू शकत नाही. म्हणजे परदेशातून, आम्हाला एक संदेश आला,” इम्रान खान म्हणाले. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने इम्रान खान यांना कोणतीही धमकी दिली नसल्याच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना रेहम खान यांनी ट्विट केले की, “हे अजूनही लाजिरवाणं होत आहे.”

रेहम खान यांनी २०१४ मध्ये इम्रान खान यांच्याशी लग्न केले होते आणि एका वर्षानंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले. ब्रिटिश-पाकिस्तानी वंशाची पत्रकार, रेहम खान पाकिस्तानच्या पंतप्रधानांची दुसरी पत्नी होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: To imran khans i have everything ex wife reham khans reply vsk