एक्स्प्रेस वृत्त

इटानगर/गंगटोक : अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. यात अरुणाचल प्रदेशात ६०पैकी ४६ जागा मिळवून भाजपने एकतर्फी विजय मिळविला. सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (एसकेएम) पक्षाने ३२पैकी ३१ जागा जिंकून निर्भेळ यश मिळविले. तेथे भाजपचे सर्व १२ आमदार पराभूत झाले असले, तरी निकालानंतर एसकेएमचे नेते व मुख्यमंत्री प्रेम सिंह तवांग यांनी आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबरच असल्याचे म्हटले आहे.

akola , eknath shinde, eknath shinde news,
पश्चिम वऱ्हाडाला शिवसेना शिंदे गटाकडून बळ, केंद्रीय राज्यमंत्री व विधान परिषद सदस्यत्व
Kumari Selja interview Haryana Congress Haryana state Assembly elections
पक्षांतर्गत दुफळी, प्रचाराच्या दोन वाटा! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणा काँग्रेसमध्ये नेमके काय सुरु आहे?
Janata Dal United JDU looks to expand footprint in UP and Jharkhand to boost NDA
कुर्मी मतांना आपलेसे करण्याचा प्रयत्न; उत्तर प्रदेश-झारखंडच्या निवडणुकीसाठी जेडीयूची तयारी
bjp face tough battle in haryana jharkhand assembly election opposite in confidence after lok sabha election results
विश्लेषण : हरियाणा, झारखंडमध्ये विधानसभेला भाजपची कसोटी; लोकसभा निकालाने विरोधकांना आत्मविश्वास?
bjp president jp nadda announces in charges for 24 states
भाजपकडून २४ राज्यांमध्ये नवे प्रभारी
How Rashtriya Lok Dal RLD has steered itself to four Houses
ना कुणाशी मैत्री, ना शत्रुत्व; राजकीय विजनवासात गेलेल्या रालोद पक्षाने कशी घेतली उभारी?
in twelve ministerial constituencies the Grand Alliance is lagging behind
बारा मंत्र्यांच्या मतदारसंघांत महायुती पिछाडीवर
narendra modi
जम्मूकाश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

अरुणाचलमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता राखताना भाजपने दणदणीत विजय मिळवला. ४६पैकी १० जागा भाजपने बिनविरोध जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री पेमा खांडू यांचीही बिनविरोध निवड झाली होती. मतदान झालेल्या ५० जागांपैकी भाजपने ३६ जागांवर विजय मिळवला. नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) पाच, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल पक्षाने दोन जागा जिंकल्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही तीन जागांवर विजय मिळविला. काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. तीन अपक्ष निवडून आले. निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वरून मतदारांचे आभार मानले आणि राज्याच्या विकासासाठी आपला पक्ष अधिक जोमाने काम करेल असे आश्वासन दिले. तर हा विजय ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी दिली. निकालानंतर राज्यपाल के टी पटनाईक यांनी सातवी विधानसभा विसर्जित केली. मुख्यमंत्री खांडू यांनी राजीनामा देताना पुन्हा सत्तास्थापनेचा दावा केला.

हेही वाचा >>>रुग्णालये, सार्वजनिक ठिकाणी अग्निसुरक्षा प्रात्यक्षिके घ्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अधिकाऱ्यांना आदेश

सिक्कीममध्ये एसकेएमने एकतर्फी विजय मिळविला. भाजप आणि एसकेएम ही निवडणूक वेगवेगळे लढले होते. भाजपने विद्यामान १२ आमदारांसह सर्व ३२ जागांवर उमेदवार उभे केले होते. हे सर्व उमेदवार पराभूत झाले. २०१९पर्यंत सलग २५ वर्षे सत्तेत राहिलेल्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटला (एसडीएफ) केवळ एकच जागा मिळाली. मात्र निकालानंतर तवांग यांनी ‘इंडियन एस्क्पेस’कडे प्रतिक्रिया देताना आपला पक्ष रालोआचा भाग असल्याचे स्पष्ट केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर भाजपला मते देणाऱ्या सिक्कीमच्या नागरिकांचे आभार मानले व तमांग यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधानांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना तमांग यांनीही राज्याच्या उन्नतीसाठी आपले सामायिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या साथीने काम करणार असल्याचे म्हटले आहे. तमांग दोन जागांवर विजयी झाले. त्यांच्या पक्षाला तब्बल ५८.३८ टक्के मते मिळाली. दरम्यान, ‘एसडीएफ’चे अध्यक्ष पवन कुमार चामलिंग दोन मतदारसंघांमधून पराभूत झाले. माजी फुटबॉल कप्तान आणि ‘एसडीएफ’चे उपाध्यक्ष भायचुंग भुतिया यांचाही पराभव झाला आहे. निकालानंतर राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी विधानसभा विसर्जित केली.