आजपर्यंत करोनामुक्त असलेल्या ‘या’ देशात सापडला करोनाचा पहिला रुग्ण; लॉकडाउनबाबत विचार सुरू!

आजपर्यंत करोनामुक्त असलेल्या या देशात करोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे.

corona endemic
(प्रातिनिधिक छायाचित्र)

न्यूझीलंडमधील एका प्रवाशाची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर टोंगा देशात करोनाचा पहिला रुग्ण नोंदवण्यात आला आहे. टोंगा हा जगातील काही उरलेल्या राष्ट्रांपैकी एक आहे ज्या देशांमध्ये करोनाचा शिरकाव झालेला नाही. इतर काही शेजारी देशांप्रमाणेच अलगीकरणामुळे हा देश करोनाचा आतापर्यंत दूर ठेवण्यात यशस्वी राहिला. मात्र, पहिला रुग्ण आढळल्यानंतर जर देशात आणखी प्रकरणी नोंदवण्यात आली तर देशातील परिस्थिती गंभीर होऊ शकते. कारण टोंगामध्ये आरोग्य सुविधांची आणि संसाधनांची कमतरता आहे.   

टोंगाजवळील फिजी देश देखील यावर्षीच्या एप्रिलपर्यंत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यात यशस्वी ठरला. मात्र, डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर फिजीमध्येही करोनाचा शिरकाव झाला आणि देशभरात ५० हजारहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली. तसेच तब्बल ६७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. टोंगाचे पंतप्रधान पोहिवा तुईओनेटोआ यांनी सांगितले की, बुधवारी न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्च शहरातून आलेल्या २१५ प्रवाशांपैकी हा प्रवासी एक होता आणि त्याला एका हॉटेलमध्ये अलगीकरणात ठेवण्यात आले होते. पंतप्रधान सोमवारी देशात लॉकडाउनबद्दल घोषणा करू शकतात, असं वृत्त मातंगी टोंगा या वेबसाइटने दिलंय.

क्राइस्टचर्च हे शहर या आठवड्यापर्यंत गेल्या अनेक महिन्यांपासून करोनामुक्त होते. मात्र, ऑकलंडमध्ये रुग्ण आढळल्यानंतर पुन्हा असंख्य प्रकरणे नोंदवली गेली. ऑगस्टपासून शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. न्यूझीलंडच्या आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की, टोंगाला जाणाऱ्या प्रवाशाला फायझरची लस देण्यात आली होती आणि टोंगाला जाण्यापूर्वी त्याची चाचणी निगेटिव्ह आली होती.   

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tonga reports its first ever corona case hrc

ताज्या बातम्या