१. गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचा डबा घसरला, मुंबई नाशिक वाहतूक ठप्प
12598 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचे एक डबा कसारा ते इगतपुरी दरम्यान घसरला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. मध्य मार्ग आणि अप मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध असल्याचं रेल्वेने म्हटलं आहे. वाचा सविस्तर : 

२. स्टोक्सने पंचांना ‘ओव्हर-थ्रो’च्या धावा न देण्याचे सुचवले होते!
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील अखेरच्या षटकात दुसरी धाव घेताना बॅटला लागून चौकार गेल्यामुळे इंग्लंडच्या बेन स्टोक्सने पंचांना चार धावा न देण्यास विनंती केली होती; परंतु पंचांनीच नियमानुसार ते योग्य असल्याचे सांगून चार धावा दिल्या, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने व्यक्त केली. वाचा सविस्तर : 

३.हाफिज सईदच्या अटकेचे पाकिस्तानकडून नाटक-शिवसेना
पाकिस्तान सरकारने हाफिज सईदच्या अटकेचे नाटक केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पाकिस्तान सरकारने बुधवारी हाफिज सईदला अटक केली. हाफिज सईद हा मुंबईवरच्या २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. ही अटक झाल्याची बातमी बुधवारीच आली. मात्र ही अटक की अटकेचे नाटक आहे असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे. सामनाच्या अग्रलेखातून पाकिस्तानावर निशाणा साधण्यात आला आहे. वाचा सविस्तर : 

४.अभिनेत्री विद्या बालनचा TikTok व्हिडिओ पाहिलात का?
अभिनेत्री विद्या बालनने तिचा एक TikTok व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू अनावर होईल यात काहीही शंका नाही. प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवी असते असे सांगताना तिने एक विनोदी व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला तिने Tak-Tuk असे नाव देत कधी कधी टाइमपासही केला पाहिजे असं म्हटलं आहे. वाचा सविस्तर : 

५.समूह पुनर्विकासासाठी कायद्यात दुरुस्ती!
मुंबईतील उपकरप्राप्त धोकादायक इमारतींचा सामूहिक पुनर्विकास करण्यासाठी कायद्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करतानाच, ‘म्हाडा’च्या माध्यमातून हा पुनर्विकास करण्याचा निर्णय बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. धोकादायक इमारतीमधील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करताना दोन वर्षांचे भाडे देण्याची हमीही सरकार देणार आहे. त्यामुळे शहरातील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासास गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.वाचा सविस्तर :