लष्कर’चा म्होरक्या हिलाल मौलवी चकमकीत ठार

लष्करे तोयबाचा म्होरक्या हिलाल मौलवी श्रीनगरमधील जुन्या शहर भागात पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. उत्तर काश्मीरमधील पट्टन आणि सोपोर भागातील अनेक नागरिकांच्या खुनामध्ये त्याचा हात होता.

लष्करे तोयबाचा म्होरक्या हिलाल मौलवी श्रीनगरमधील जुन्या शहर भागात पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. उत्तर काश्मीरमधील पट्टन आणि सोपोर भागातील अनेक नागरिकांच्या खुनामध्ये त्याचा हात होता.
श्रीनगर शहरातील फतेहकदालमधील नरपरिस्तान भागात तोयबाचा अतिरेकी हिलाल मौलवी आला असल्याची माहिती बुधवारी रात्री पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या एका तुकडीने गुरूवारी पहाटे या भागात सापळा रचून मौलवी थांबलेल्या घराला वेढा दिला. आपण वेढले गेलो आहोत, असे समजताच हिलालने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीदेखील प्रत्युत्तर देत गोळीबार केला. थोडावेळ चाललेल्या या गोळीबारात हिलाल मारला गेला. एक अधिकारी व दोन पोलिस कर्मचारी या चकमकीत जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले.
मुळचा बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टनचा रहिवासी असलेल्या मौलवीने पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून या भागात आश्रय घेतला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.     

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Top lashkar militant hilal molvi killed in kashmir encounter