वॉशिंग्टन : अमेरिकेच्या लष्करी गुप्तचर विभागाशी संबंधित कागदपत्रे उघड करण्यामागे कोणाचा हात आहे याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तर यामागे आपला कोणताही हात नसल्याचा दावा रशियाने केला आहे. पेंटागॉनशी संबंधित १०० हून अधिक गोपनीय कागदपत्रे शुक्रवारी ट्विटरवर प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर याच्या पाठीमागे रशियाचा हात आहे का असा प्रश्न विचारला गेला. त्यावर प्रत्येक घटनेमागे आमचाच हात असतो का असा सवाल रशियाने केला.

दुसरीकडे या घटनेनंतर युक्रेनला आपल्या काही लष्करी योजनांमध्ये बदल करणे भाग पडले आहे. ही कागदपत्रे विशेषत: युक्रेन युद्धाशी संबंधित आहेत. रशियाच्या संरक्षण आणि गुप्तचर विभागामध्ये अमेरिकेने किती खोलवर घुसखोरी केली आहे हेही या कागदपत्रांमधून दिसून येत आहे. रशियाच्या हल्ल्यांविषयी अमेरिकेने युक्रेनला आधीच इशाराही दिला होता. त्याबरोबर रशियाच्या युद्ध यंत्रणेच्या ताकदीचाही अंदाज अमेरिकेला आहे असे दिसते. ही कागदपत्रे उघड झाल्यामुळे अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. अशा प्रकारे गुपिते उघड झाल्यामुळे   महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भीती त्यांना वाटत आहे.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!