scorecardresearch

Premium

VIDEO : भीषण अपघात! पर्यटकांची बस १०० फूट खोल दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू; अनेकजण गंभीर जखमी

बस दरीत कोसळ्यानंतर स्थानिक मदतीसाठी सरसावले पण…

bus accident tamilnadu
तामिळनाडूत बस दरीत कोसळली ( छायाचित्र – पीटीआय )

तामिळनाडूतील कुन्नूर येथे शनिवारी ( ३० सप्टेंबर ) भीषण अपघात झाला आहे. पर्यटकांची बस १०० फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उटीवरून बस मेट्टूपालयमला जात होती. बसमध्ये ५५ पर्यटक होते. पण, मारापलमजवळ येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं खोल दरीत जाऊन कोसळली. यानंतर पोलिसांनी बचावकार्याला सुरूवात केली आहे.

uran potholes and dust on the road, uran people suffer due to potholes, dust due to potholes in uran
उरण : पावसाळा सरला आणि रस्त्यांवर धुरळा पसरला; प्रवाशांना खड्डे आणि धुरळा यांचा करावा लागतोय सामना
Doctor
आरोग्य विभागाकडे औषधे उदंड, मात्र डॉक्टरांची वानवा! १,१०० कोटींच्या औषधांची खरेदी तर १७,८६४ पदं रिक्त
Homemade Onion Hair Oil
Hair Growth: कांदा किसा-रस काढा आणि..? केसांच्या सर्व तक्रारींवर घ्या रामबाण उपाय
marathi actress alka kubal birthday special
अपघातामुळे वजन गेलं शंभरीपार.. अलका कुबल यांनी कशी केली त्यावर मात? वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल

कोईम्बतूरचे पोलीस उपमहानिरीक्षक सरवण सुंदर म्हणाले, अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी आहेत. जखमींना कुन्नूर येथील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस १०० फूट खोल दरीत कोसळली. स्थानिक नागरिक मदतीसाठी सरसावले. पण, अंधारामुळे मदतकार्यास अडथळे निर्माण झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, बचावकार्यासह सुरूवात केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tourist bus falls into gorge in tamil nadu marapalam killed several injured ssa

First published on: 30-09-2023 at 22:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×