scorecardresearch

केंद्र सरकारकडून पर्यटन व्हिसा पूर्ववत

करोनाकाळात बंद करण्यात आलेला ई-पर्यटन व्हिसा केंद्र सरकारने पूर्ववत केला आहे.

नवी दिल्ली : करोनाकाळात बंद करण्यात आलेला ई-पर्यटन व्हिसा केंद्र सरकारने पूर्ववत केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ १५६ देशांतील नागरिकांना होणार आहे. सर्व देशांतील नागरिकांसाठी देण्यात येणारा नियमित पर्यटन व्हिसाही आता मिळणार असून त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात आली.  अमेरिका आणि जपान या देशांतील नागरिकांसाठी देण्यात येणारा १० वर्षांसाठीचा नियमित पर्यटन व्हिसाही पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याने मार्च २०२० पासून केंद्र सरकारने पाच वर्षांसाठी असणारा पर्यटन व्हिसा देणे बंद केले होते. मात्र आता रुग्णसंख्या कमी झाल्याने हे पुन्हा सुरू केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tourist visa revoked central government ysh

ताज्या बातम्या