रस्त्यावर गाडी उभी करणाऱ्यांसाठी नवा कायदा? गडकरींच्या वक्तव्यामुळे चर्चा; म्हणाले “दंडाच्या रकमेतील…”

चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या वाहनाचा फोटो पाठवणाऱ्याला ५०० रुपये?; नितीन गडकरींच्या वक्तव्यामुळे चर्चा

रस्त्यावर गाडी उभी करणाऱ्यांसाठी नवा कायदा? गडकरींच्या वक्तव्यामुळे चर्चा; म्हणाले “दंडाच्या रकमेतील…”
चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या वाहनाचा फोटो पाठवणाऱ्याला ५०० रुपये?; नितीन गडकरींच्या वक्तव्यामुळे चर्चा

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या वाहनाचा फोटो काढून पाठवणाऱ्याला ५०० रुपये देण्यासंबंधी नवा कायदा आणण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीमध्ये आयोजित इंडस्ट्रियल डेकार्बोनायझेशन समिटमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पार्किंग ही फार मोठी समस्या असल्याचं सांगितलं. दरम्यान नितीन गडकरी यांनी केलेलं हे वक्तव्य उपहासात्मकपणे होतं की खरंच गांभीर्याने विचार सुरु आहे याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही.

गडकरी काय म्हणाले –

“प्रत्येक व्यक्ती गाडी घेत आहे. माझ्या नागपुरातील घऱी स्वयंपाक करणाऱ्याकडेही दोन गाड्या आहेत. याआधी अमेरिकेत सफाई करणारी महिला गाडीतून यायची तेव्हा आपण आश्चर्याने पाहायचो. पण आता आपल्याकडेही तेच होत आहे. कुटुंबात चार माणसं आणि सहा गाड्या असतात. दिल्लीवाले तर नशिबवान आहेत, कारण आम्ही रस्ते त्यांच्या पार्किगसाठी तयार केले आहेत. कोणीही पार्किंग तयार करत नाही, सगळे रस्त्यावर गाडी उभी करतात,” अशी खंत यावेळी गडकरींनी बोलून दाखवली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी एक कायदा आणणार आहे. रस्त्यावर जो गाडी उभी करणार त्याचा मोबाइलवरुन फोटो काढून पाठवल्यास दंडातील १००० रुपयांपैकी ५०० रुपये त्याला दिले जातील”. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

मोठं घर बांधल्यानंतर खाली पार्किंगसाठीही जागा बनवा असा सल्ला यावेळी गडकरींनी दिला. माझ्या नागपुरातील घरी १२ गाड्यांसाठी अंडरग्राऊंड पार्किंग आहे. मी रस्त्यावर गाडी उभी करत नाही अशी माहिती यावेळी गडकरींनी दिली.

नितीन गडकरी यांनी आपल्या युट्यूब अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर गरजेचा असल्याचं सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Transport minister nitin gadkari says rs 500 reward for picture of wrongly parked vehicle sgy

Next Story
‘अग्निपथ’विरोधी हिंसक आंदोलनांनंतर मोदी सरकार एक पाऊल मागे; वयोमर्यादा २१ वरुन २३ वर; आक्षेप, आंदोलनं अन् राजकीय कोंडीमुळे निर्णय
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी