scorecardresearch

अमेरिकेतील ‘९-११’ हल्लातील मृतांना श्रद्धांजली

अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला रविवारी २१ वर्षे पूर्ण झाली.

अमेरिकेतील ‘९-११’ हल्लातील मृतांना श्रद्धांजली

न्यूयॉर्क : अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला रविवारी २१ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त अमेरिकन नागरिकांनी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. अमेरिकेत विविध ठिकाणी जमा होऊन नागरिकांनी या हल्ल्यातील मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली.  अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी  पेंटेगॉन येथे नागरिकांना संबोधित केले. २१ वर्षांपूर्वी अल कायदा संघटनेच्या दहशतवाद्यांतर्फे अपहृत विमानांद्वारे न्यूयॉर्कमधील वल्र्ड ट्रेड सेंटर, लष्कराचे मुख्यालय पेंटेगॉन व पेनसिल्वानियात लागोपाठ आत्मघातकी हल्ले करण्यात आले. त्यात सुमारे तीन हजार नागरिक मृत्युमुखी पडले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tributes victims 9 11 attacks america terrorist attack citizens ysh