तिहेरी तलाक दिलेल्या महिलेवर निकाह हलालाच्या बहाण्याने बलात्कार; आरोपींना अटक

तिहेरी तलाक दिलेल्या एका महिलेवर निकाह हलालाच्या बहाण्याने दोन पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

rape
(प्रातिनिधिक छायाचित्र)

तिहेरी तलाक दिलेल्या एका महिलेवर निकाह हलालाच्या बहाण्याने दोन पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेला तिच्या पतीने तिहेरी तलाक दिला होता. त्यानंतर तिची त्याच्याशी पुन्हा विवाह करण्याची इच्छा होती. यावेळी निकाल हलालाच्या बहाण्याने तिच्यावर दोन जणांनी बलात्कार केला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये घडली आहे.

पीडिता मेरठच्या लिसारी गेट पोलीस स्टेशन परिसरात राहते. सहा महिन्यांपूर्वी तिला तिच्या पतीने तिहेरी तलाक दिला होता. पतीने रागाच्या भरात तिला तिहेरी तलाक दिला. मात्र, नंतर त्याला त्याच्या या निर्णयाचा पश्चाताप झाला आणि त्याने तिच्याशी पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील एका मौलवीने या महिलेला आधी निकाह हलाला करण्यास सांगितले. निकाह हलाला ही एक प्रथा आहे ज्यामध्ये तिहेरी तलाक देणाऱ्या पुरुषाशी पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या स्त्रीला आधी दुसऱ्या पुरुषाशी लग्न करावे लागते. हा विवाह केल्यानंतर घटस्फोट घ्यावा लागतो आणि ‘इद्दत’ नावाचा विभक्ततेचा कालावधी पाळावा लागतो. यानंतरच ती तिच्या आधीच्या पतीशी लग्न करू शकते.

दरम्यान, पीडित महिलेला रियासत नावाच्या पुरुषाशी लग्न करण्यास सांगण्यात आले. रविवारी या मौलवीने महिला आणि रियासत या दोघांनाही लग्नाच्या बहाण्याने टीपी नगर भागातील एका हॉटेलमध्ये बोलावले. रियासतने त्याच्या उमेद नावाच्या मित्रालाही हॉटेलमध्ये बोलावले आणि दोघांनी महिलेवर बलात्कार केला. पीडितेने तिच्या भावाला घडलेल्या घटनेची माहिती दिली आणि त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून मौलवीचा शोध सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Triple talaq divorced woman gangraped on pretext of nikah halala in meerut hrc

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका